रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खरीप हंगाम 2025 मध्ये खतांची उपलब्धता पुरेशी

Posted On: 01 AUG 2025 6:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025

चालू खरीप हंगाम 2025 मध्ये देशात युरिया, डीएपी, एमओपी आणि एनपीकेएस या खतांची उपलब्धता पुरेशी राहिली.

देशात खतांची वेळेवर आणि पुरेशी उपलब्धता राहावी यासाठी सरकारकडून प्रत्येक हंगामात पुढील उपाययोजना केल्या जातात:

i.प्रत्येक पीक हंगाम सुरू होण्यापूर्वी, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागामार्फत (DA&FW), सर्व राज्य सरकारांशी सल्लामसलत करून, राज्यवार आणि महिन्यानुसार खतांच्या गरजेचे मूल्यांकन केले जाते .

ii. अंदाजित गरजेच्या आधारावर, खते विभाग मासिक पुरवठा योजना जारी करून राज्यांना पुरेशा प्रमाणात खतांचे वाटप केले जाते  आणि उपलब्धतेवर देखरेख ठेवली जाते .

iii.देशभरातील सर्व प्रमुख अनुदानित खतांच्या हालचालींवर एकात्मिक खत देखरेख प्रणाली (iFMS) नावाच्या ऑनलाइन वेब-आधारित देखरेख प्रणालीद्वारे लक्ष ठेवले जाते.

iv. डीए अँड एफडब्ल्यू आणि डी/ओ खते विभाग यांची राज्य कृषी अधिकाऱ्यांबरोबर  नियमित साप्ताहिक व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली जाते आणि राज्य सरकारांनी सूचित केल्याप्रमाणे खते पाठवण्याबाबत सुधारणात्मक कार्यवाही केली जाते.

याशिवाय, डी/ओ फर्टिलायझर्सने एक डॅशबोर्ड देखील विकसित केला आहे जो अधिकृत वापरकर्त्यांना https://urvarak.nic.in येथे उपलब्ध आहे. राज्य कृषी विभाग, जिल्हाधिकारी आणि राज्य पणन महासंघ अशा विविध भागधारकांना सुलभ देखरेख ठेवता यावी, यासाठी डॅशबोर्ड विकसित करण्यात आला आहे. राज्य सरकारे आयएफएमएस (iFMS) आणि ई-उर्वरक (e-Urvarak) डॅशबोर्ड पोर्टलद्वारे खतांची उपलब्धता आणि पुरवठ्यावर लक्ष ठेवत आहेत.

केंद्रीय रसायन आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे /प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2151516)