आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमाबाबत अद्ययावत माहिती
पीएमएनडीपी कार्यक्रमाची देशातील 751 जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी
Posted On:
01 AUG 2025 3:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025
प्रधानमंत्री राष्ट्रीय डायालिसिस कार्यक्रम (पीएमएनडीपी) देशातील सर्व 36 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील 751 जिल्ह्यांमध्ये राबवण्यास सुरुवात झाली आहे. 30 जून 2025 पर्यंत देशभरात एकूण 1,704 डायालिसिस केंद्रे कार्यरत आहेत.
केंद्र शासनाने देशातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये हिमोडायलिसिस केंद्रे स्थापन करण्याची शिफारस केली असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने तालुका स्तरावरील सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्येही स्थापन केले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.
या कार्यक्रमाची अंमलबजावणी संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून त्यांच्या गरज आणि टंचाई मूल्यांकनाच्या आधारे केली जात आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून प्रधानमंत्री राष्ट्रीय डायालिसिस कार्यक्रमांतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना हेमोडायालिसिस आणि पेरिटोनियल डायालिसिस सेवा राबविण्यासाठी त्यांच्या वार्षिक कार्यक्रम अंमलबजावणी आराखड्याद्वारे करण्यात आलेल्या टंचाई मूल्यांकनावर आधारित सहाय्य पुरविण्यात येते. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील दुर्गम आणि आदिवासी भागांसह सर्व लोकसंख्येसाठी डायालिसिस सेवा स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जाते.
सुवर्णा बेडेकर/राज दळेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2151291)