संरक्षण मंत्रालय
चौगुले शिपयार्ड येथे तटरक्षक दलासाठी स्वदेशी हॉवरक्राफ्टच्या बांधणीचे काम सुरू
Posted On:
30 JUL 2025 3:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जुलै 2025
गोव्यातील चौगुले अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या शिपयार्डमध्ये 30 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भारतीय तटरक्षक दलाने (ICG) गर्डर उभारणी करून आपल्या पहिल्या स्वदेशी एअर कुशन व्हेईकल (ACV) च्या बांधणीच्या कामाचा प्रारंभ केला. विविध किनारी सुरक्षेच्या कार्यवाहींमध्ये कसोटीस उतरलेले, ग्रिफॉन हॉवरवर्क डिझाइन्सवर आधारित असलेले हे हॉवरक्राफ्ट भारतीय कौशल्याने तयार केले जात आहेत. याचा समावेश झाल्यानंतर ACV मुळे वाढीव गती, सामरिक लवचिकता आणि उथळ पाण्यातील परिचालन क्षमता प्राप्त होईल, त्यामुळे भारताच्या विशाल सागरी सीमेवरील गस्त, प्रतिबंध आणि शोध आणि बचाव मोहिमांमध्ये जलद प्रतिसाद देणे शक्य होईल.
A5FU.jpeg)
भारताच्या सागरी प्रतिसाद क्षमता बळकट करण्याच्या दिशेने मोठे पाऊल असलेला हा समारंभ भारतीय तटरक्षक दलाचे उपमहासंचालक (सामग्री आणि देखभाल), महानिरीक्षक सुधीर साहनी यांच्या उपस्थितीत पार पडला. ही बांधणी 24 ऑक्टोबर 2024 रोजी सहा ACV साठी संरक्षण मंत्रालयासोबत करण्यात आलेल्या कराराच्या अनुषंगाने करण्यात येत असून, त्यातून आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत आयसीजीचे ऑपरेशनल स्वयंपूर्णता साध्य करण्याचे प्रयत्न अधोरेखित होतात.
DVHZ.jpeg)
* * *
जयदेवी पुजारी स्वामी/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2150116)