पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मालदीवच्या स्वातंत्र्यदिनाच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

प्रविष्टि तिथि: 26 JUL 2025 6:47PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदीवच्या माले इथल्या आपल्या भेटीदरम्यान, मालदीवच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. मालदीवच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला भारतीय पंतप्रधानांनी उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती. तसेच, राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांनी आदरातिथ्य केलेले पंतप्रधान मोदी हे पहिले परदेशी नेते ठरले आहेत.

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिक स्क्वेअर येथे झालेल्या स्वातंत्र्यदिन संचलनाची पाहणी केली. यावेळी, पंतप्रधानांनी मालदीवच्या लोकांना आणि सरकारला शुभेच्छाही दिल्या. या सोहळ्यात मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलांनी आणि इतर स्थानिक तुकड्यांनी जोशपूर्ण संचलन केले. यासोबतच, आधुनिक राष्ट्र म्हणून मालदीवच्या यशावर आधारित अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले.

राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू आणि मालदीवच्या जनतेने केलेल्या आदरातिथ्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. स्वातंत्र्यदिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधानांची उपस्थिती, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमधला एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.  2025 या वर्षात भारत आणि मालदीव दरम्यान राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याला 60 वर्षे पूर्ण झाली आहेत.

***

माधुरी पांगे/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2148930) आगंतुक पटल : 206
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam