संरक्षण मंत्रालय
डीआरडीओने प्रगत मानवरहित हवाई वाहन प्रक्षेपित प्रेसिजन गाईडेड मिसाइल-व्ही3 च्या यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या
Posted On:
25 JUL 2025 2:47PM by PIB Mumbai
भारताच्या संरक्षण क्षमतेला मोठी चालना देत, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आंध्र प्रदेशातील कुरनूल येथील नॅशनल ओपन एरिया रेंज (एनओएआर) चाचणी रेंजमध्ये मानवरहित हवाई यान प्रक्षेपित प्रिसिजन गाइडेड मिसाईल (यूएलपीजीएम)-व्ही 3 ची यशस्वी उड्डाण-चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र डीआरडीओने यापूर्वी विकसित केलेल्या आणि वितरित केलेल्या यूएलपीजीएम-व्ही2 (ULPGM-V2) क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती आहे.

यूएलपीजीएम-व्ही 3, हाय डेफिनेशन ड्युअल-चॅनेल सीकर सह सुसज्ज आहे, जो विविध प्रकारच्या लक्ष्यांवर मारा करू शकतो. मैदानी आणि उंचीवरील प्रदेशात ते डागता येते. यामध्ये दिवस-रात्र वापरण्याची क्षमता आणि प्रक्षेपणोत्तर लक्ष्य/उद्दिष्ट-बिंदू अपडेटला समर्थन देण्यासाठी द्वि-मार्गी डेटा लिंक आहे. हे क्षेपणास्त्र तीन मॉड्युलर वॉरहेड पर्यायांनी सुसज्ज आहे.
डीआरडीओच्या प्रयोगशाळांनी संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यूएलपीजीएम-व्ही 3 प्रणालीचा विकास आणि यशस्वी चाचणीसाठी डीआरडीओ आणि उद्योग भागीदार, डीसीपीपी, एमएसएमई आणि स्टार्ट-अप्सचे अभिनंदन केले आहे. हे यश म्हणजे, भारतीय उद्योग आता महत्त्वपूर्ण संरक्षण तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि त्याचे उत्पादन करण्यासाठी सज्ज असल्याचा दाखला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनी सर्व चमू, डीसीपीपी आणि स्टार्ट-अप्सचे अभिनंदन केले, आणि असे शस्त्र विकसित करणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
***
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2148462)