पंतप्रधान कार्यालय
ढाका येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख
प्रविष्टि तिथि:
21 JUL 2025 8:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जुलै 2025
ढाका येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अनेक तरुण विद्यार्थ्यांसह कित्येक जण मृत्युमुखी पडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुःख व्यक्त केले. या प्रसंगी भारत बांगलादेशासोबत एकजुटीने उभा आहे आणि सर्व प्रकारचा पाठींबा आणि मदत देण्यासाठी तयार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
‘एक्स’ समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की ;
ढाका येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातातील जीवितहानीमुळे तीव्र धक्क्यासह दुःखी झालो आहे. त्यांच्यापैकी अनेक तरुण विद्यार्थी होते. शोकाकुल कुटुंबांविषयी आम्ही तीव्र संवेदना व्यक्त करतो. अपघातातील जखमींना लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करतो. या प्रसंगी बांगलादेशासोबत भारत एकजुटीने उभा आहे आणि सर्व प्रकारचा पाठींबा तसेच मदत देण्यासाठी तयार आहे.”
सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2146601)
आगंतुक पटल : 31
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam