राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत रेवेनशॉ विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

Posted On: 15 JUL 2025 5:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 जुलै 2025

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज (15 जुलै 2025) ओडिशातील कटक येथील रेवेनशॉ विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पार पडला.

हे शैक्षणिक केंद्र स्वातंत्र्यलढ्याचे एक सक्रिय केंद्र होते आणि ओडिशा राज्याच्या स्थापनेशी देखील निगडित होते, असे राष्ट्रपती या कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाल्या. शिक्षण विकास आणि महिला सक्षमीकरणासाठी ही संस्था सातत्याने बहुमोल योगदान देत आहे.

   

हे युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, थ्रीडी प्रिंटिंग आणि क्लाउड कम्प्युटिंग यांनी आपल्या विचारसरणी आणि कार्यशैलीत मोठा बदल घडवून आणला आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. हे विद्यापीठ या तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या प्रगत तंत्रज्ञानाच्या गैरवापरापासून सर्वांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला त्यांनी दिला.

  

आपला देश अमृत काळातून जात आहे. वर्ष 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवणे हे आपले राष्ट्रीय ध्येय आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. राष्ट्र प्रथम ही भावना आपले सर्वात मोठे सामर्थ्य आहे. आपले सैनिक, शेतकरी, अभियंते, डॉक्टर्स आणि विविध क्षेत्रात कार्य करणारे लोक भारताचा अभिमान वृद्धिंगत करण्यासाठी काम करत आहेत. विद्यार्थ्यांनी या सर्वांपासून प्रेरणा घ्यावी आणि आपले ज्ञान,कौशल्य आणि निष्ठेने राष्ट्राच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

  

 

* * *

सोनाली काकडे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2144898) Visitor Counter : 2