पंतप्रधान कार्यालय
कोटा श्रीनिवास राव गारू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
13 JUL 2025 3:55PM by PIB Mumbai
कोटा श्रीनिवास राव गारू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. कोटा श्रीनिवास राव गारू यांची चित्रपटविषयक प्रतिभा आणि अष्टपैलुत्व या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे ते स्मरणात राहतील असे मोदी यांनी म्हटले आहे. शानदार अभिनयाने त्यांनी पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सामाजिक सेवेतही ते आघाडीवर होते आणि गरीब तसेच वंचितांना सक्षम करण्यासाठी त्यांनी मोलाचे काम केले, असे मोदी पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी X प्रसार माध्यमावर वर पोस्ट केले की;
“श्री कोटा श्रीनिवास राव गारू यांच्या निधनाने अतीव दुःख झाले आहे. त्यांची चित्रपटविषयक प्रतिभा आणि अष्टपैलुत्व या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे ते कायम स्मरणात राहतील. शानदार अभिनयाने त्यांनी पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सामाजिक सेवेतही ते आघाडीवर होते आणि गरीब तसेच दलितांना सक्षम करण्यासाठी त्यांनी मोलाचे काम केले. त्यांच्या कुटुंबियांचे आणि असंख्य चाहत्यांचे आपण सांत्वन करतो. ओम शांती.”
***
N.Chitale/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2144379)
आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam