पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नामिबियाच्या राष्ट्रीय विधिमंडळात पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 09 JUL 2025 10:14PM by PIB Mumbai

माननीय सभापती महोदया,

सन्माननीय पंतप्रधान,

माननीय उपपंतप्रधान,

माननीय उपसभापती,

सन्माननीय संसद सदस्य,

माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

 

ओमवा उहाला पो नावा?

शुभ दुपार!

लोकशाहीचे मंदिर असलेल्या या सन्माननीय सभागृहाला संबोधित करणे हा एक मोठा सन्मान आहे. हा सन्मान मला दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो.

लोकशाहीच्या जननीचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे. आणि, भारतातील 1.4 अब्ज जनतेच्या हार्दिक शुभेच्छा मी माझ्यासोबत घेऊन आलो आहे.

कृपया मला तुमच्या प्रत्येकाचे अभिनंदन करून सुरुवात करण्याची परवानगी द्या. जनतेने तुम्हाला या महान राष्ट्राची सेवा करण्याचा आदेश दिला आहे. राजकारणात, जसे तुम्ही जाणताच की, तो एक सन्मान आणि एक मोठी जबाबदारी दोन्ही आहे. तुमच्या जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यात तुम्हाला यश मिळो अशा शुभेच्छा मी व्यक्त करतो.

 

मित्रांनो,

काही महिन्यांपूर्वी, तुम्ही एक ऐतिहासिक क्षण साजरा केला. नामिबियाने आपल्या पहिल्या महिला राष्ट्रपतीची निवड केली. तुमचा अभिमान आणि आनंद आम्ही जाणतो आणि त्यात सहभागी होतो, कारण भारतात आम्हीसुद्धा अभिमानाने म्हणतो - महोदया राष्ट्रपती.

हे भारताचे संविधान आहे, ज्यायोगे एका गरीब आदिवासी कुटुंबातील कन्या आज जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत राष्ट्रपती पद भूषवित आहे. ही संविधानाची ताकद आहे, ज्यामुळे माझ्यासारख्या गरीब कुटुंबात जन्म घेणाऱ्या व्यक्तीला सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पद भूषवण्याची संधी मिळत आहे. ज्याच्यापाशी काहीच नाही, त्याला संविधानाबाबत खात्री आहे.

भारताच्या संविधानाची ताकद आहे की एका गरीब आदिवासी कुटुंबातील मुलगी आज भारताची राष्ट्रपती आहे. याच संविधानाने माझ्यासारख्या व्यक्तीला पंतप्रधान होण्याची संधी दिली. एकदा नाही, दोनदा नाही, तर तीन वेळा. जेव्हा तुमच्याकडे काहीही नसते, तेव्हा संविधान तुम्हाला सर्व काही बहाल करते.

 

सन्माननीय सभासदांनो,

या सन्माननीय सभागृहात उभे राहून, मी नामिबियाचे पहिले राष्ट्रपती आणि संस्थापक जनक, राष्ट्रपती सॅम नुजोमा यांना श्रद्धांजली अर्पण करतो ज्यांचे या वर्षाच्या सुरुवातीला निधन झाले. त्यांनी एकदा जे म्हटले होते ते मी याठिकाणी उद्धृत करतो:

"आपल्याला प्राप्त झालेले स्वातंत्र्य आपल्यावर एक मोठी जबाबदारी निश्चित करते, केवळ आपल्या कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचीच नव्हे तर वंश, पंथ किंवा वर्णाचा विचार न करता सर्वांसाठी समानता, न्याय आणि उच्च प्रतीची संधी प्रस्थापित करण्याची देखील."

न्याय्य आणि स्वतंत्र राष्ट्राचे त्यांचे स्वप्न आपल्या सर्वांना सातत्याने प्रेरणा देत आहे. तुमच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेणाऱ्या होसेया कुटाको, हेंड्रिक विटबूई, मंडुमे या न्डेमुफायो आणि इतर अनेक नायकांचे स्मरण करण्याच्या तुमच्या कृतीबाबत आम्ही आदर व्यक्त करतो..

तुमच्या मुक्ती संग्रामात भारतातील जनता नामिबियाच्या पाठीशी अभिमानाने उभी राहिली. आपल्या स्वतःच्या स्वातंत्र्यापूर्वीही, भारताने दक्षिण पश्चिम आफ्रिकेचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांमध्ये उपस्थित केला होता.

स्वातंत्र्याच्या तुमच्या प्रयत्नात आम्ही SWAPO ला पाठिंबा दिला. खरं पाहता, भारताने परदेशात त्यांचे पहिले राजनैतिक कार्यालय उघडण्यासाठी यजमानत्व केले. आणि, नामिबियामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैन्याचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल दिवाण प्रेम चंद हे एक भारतीय होते..

भारताला तुमच्या पाठीशी केवळ शब्दातून नव्हे तर कृतीच्या माध्यमातूनही उभे राहिल्याबद्दल अभिमान वाटत आहे - नामिबियाचे सुप्रसिद्ध कवी म्वुला या नांगोलो यांनी जे लिहिले आहे आणि ते मी याठिकाणी उद्धृत करतो:

"जेव्हा आपल्या देशात स्वातंत्र्य अवतरेल, तेव्हा आम्ही अभिमानाने स्मृतीमध्ये सर्वोत्तम स्मारकाची उभारणी करू."

आज, ही संसद आणि हे स्वतंत्र आणि स्वाभिमानी नामिबिया, ही जिवंत स्मृतीस्थळे आहेत.

 

मान्यवर सभासदांनो,

भारत आणि नामिबियामध्ये बरेच साम्य आहे. आपण दोघांनीही वसाहतवादी राजवटीविरुद्ध लढा दिला. आपण दोघेही सन्मान आणि स्वातंत्र्याची मुल्ये जपतो. आपले संविधान आपल्याला समानता, स्वातंत्र्य आणि न्याय टिकवून ठेवण्याबाबत मार्गदर्शन करते. आपण ग्लोबल साउथ देशां

चा हिस्सा आहोत आणि आपल्या लोकांची आशा आणि स्वप्ने समान आहेत.

आज, आपल्या लोकांमधील मैत्रीचे प्रतीक म्हणून नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्याबद्दल मला खूप सन्मानजनक वाटत आहे. नामिबियाच्या कठीण तसेच सुंदर वनस्पतींप्रमाणे, आपली मैत्री काळाच्या कसोटीवर उतरली आहे. ती अगदी कोरड्या ऋतूतही शांतपणे फुलते. आणि, तुमची राष्ट्रीय वनस्पती वेल्विट्स्चिया मिराबिलिसप्रमाणेच, ती वय आणि काळासह अधिकाधिक दृढ होत आहे. भारतातील 1.4 अब्ज जनतेच्या वतीने, या सन्मानाबद्दल मी पुन्हा एकदा नामिबियाचे राष्ट्रपती, सरकार आणि नामिबियाच्या जनतेचे आभार मानतो.

 

मित्रांनो,

भारत नामिबियासोबतच्या ऐतिहासिक संबंधांना खूप महत्त्व देतो. केवळ भूतकाळातील आपल्या संबंधांना आम्ही महत्त्व देत नाही, तर आपल्या सामायिक भविष्याची क्षमता साकार करण्यावरही लक्ष केंद्रित करतो. नामिबियाच्या व्हिजन 2030 आणि हराम्बी समृद्धी योजनेवर एकत्र काम करणे आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.

आणि, आमच्या भागीदारीच्या केंद्रस्थानी आमची जनता आहे. 1700 हून अधिक नामिबियावासीयांना भारतातील शिष्यवृत्ती आणि क्षमता निर्माण कार्यक्रमांचे लाभ मिळाले आहेत. नामिबियातील शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि नेत्यांच्या पुढील पिढीला पाठिंबा देण्यास आम्ही उत्सुक आहोत. माहिती तंत्रज्ञानातील उत्कृष्टता केंद्र, नामिबिया विद्यापीठाच्या जेईडीएस कॅम्पसमधील इंडिया विंग आणि संरक्षण आणि सुरक्षेतील प्रशिक्षण - यापैकी प्रत्येक क्षेत्र क्षमता ही सर्वोत्तम चलन आहे हा आमचा सामायिक विश्वास प्रतिबिंबित करतो.

चलनाबद्दल बोलताना, आम्हाला आनंद वाटत आहे की नामिबिया हा भारताच्या यूपीआय - युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसचा अवलंब करणाऱ्या प्रदेशातील पहिल्या देशांपैकी एक आहे. लवकरच, लोक "टांगी युनेने" म्हणण्यापेक्षा अधिक जलद पैसे पाठवू शकतील. लवकरच, कुनेने येथील हिम्बा आजी किंवा कटुतुरा येथील दुकानदार, फक्त एका टॅपने स्प्रिंगबॉकपेक्षाही जलद डिजिटल होऊ शकतील.

आपला द्विपक्षीय व्यापार 800 दशलक्ष डॉलर्सच्या पुढे गेला आहे. पण, क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे, आम्ही केवळ शरीरात उष्णता खेळवत आहोत. आम्ही वेगाने खेळ करून अधिक धावा जमवू .

आम्हाला नामीबियाच्या युवकांना उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमातून पाठिंबा देताना सन्मान वाटतो. हे एक असे केंद्र असेल जिथे व्यवसायिक स्वप्नांना मार्गदर्शन, वित्तपुरवठा आणि मित्र देखील मिळतील.

आरोग्य हे आपल्या सामायिक प्राधान्याचे आणखी एक महत्त्वाचे अंग आहे. भारताची आरोग्य विमा योजना ‘आयुष्मान भारत’ सुमारे 50 कोटी लोकांना संरक्षण देते परंतु, भारताची आरोग्याबद्दलची चिंता ही केवळ भारतीयांसाठी मर्यादित नाही.

भारताचे ध्येय – `वन अर्थ, वन हेल्थ` अर्थात सर्वांच्या आरोग्यासाठी एक पृथ्वी एक दृष्टीकोन – आरोग्याकडे एक सामायिक जागतिक जबाबदारी म्हणून पाहते.

कोविड महामारी दरम्यान, आम्ही आफ्रिकेच्या पाठीशी उभे राहिलो – अनेक देशांनी त्या काळात पुरवठा करण्यास नकार दिला होता तरी लस व औषधे पुरवली. आमचा `आरोग्य मैत्री` उपक्रम आफ्रिकेला रुग्णालये, उपकरणे, औषधे आणि प्रशिक्षण देऊन मदत करतो. भारत नामीबियाला प्रगत कर्करोग उपचारांसाठी ‘भाभाट्रॉन’ रेडिओथेरपी मशीन पुरविण्यास तयार आहे. हे यंत्र भारतात विकसित झाले आहे आणि 15 देशांमध्ये बसवले गेले असून जवळपास पाच लाख रुग्णांना उपचार देण्यात मदत झाली आहे.

आम्ही नामीबियाला ‘जन औषधी’ कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण देतो, जेणेकरून परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण औषधांना प्रवेश मिळू शकेल. या कार्यक्रमाअंतर्गत भारतात औषधांच्या किमती 50 ते 80 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. हा उपक्रम दररोज 10 लाखांहून अधिक भारतीयांना मदत करत आहे. आणि आतापर्यंत या कार्यक्रमामुळे रुग्णांचे सुमारे 4.5 अब्ज अमेरिकन डॉलर वाचले आहेत.

 

मित्रांनो,

भारत आणि नामीबिया यांच्यात सहकार्य, संवर्धन आणि सहानुभूती यांची एक प्रेरणादायी गोष्ट आहे. तुम्ही आमच्या देशात चित्त्यांची पुनर्प्रवेशासाठी मदत केलीत, ही ती गोष्ट आहे. आम्ही तुमच्या या भेटीसाठी अत्यंत आभारी आहोत. मला कुनो राष्ट्रीय उद्यानात त्यांना सोडण्याचा सन्मान मिळाला.

त्यांनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवला आहे: `इनिमा आइशे ओयिली नावा` अर्थात सर्व काही ठीक आहे.

ते आनंदी आहेत आणि त्यांच्या नव्या घरात चांगले रुळले आहेत. त्यांची संख्या देखील वाढली आहे. स्पष्ट आहे की त्यांना भारतात वेळ घालवणे आवडते आहे.

 

मित्रांनो,

आपण आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा युती सारख्या उपक्रमांद्वारे एकत्र काम करत आहोत. आज नामीबिया जागतिक जैवइंधन आघाडी आणि आंतरराष्ट्रीय वाघ- सिंह आघाडीमध्ये सहभागी झाला आहे.

भविष्यात पाहताना, आपण नामीबियाचा राष्ट्रीय पक्षी – आफ्रिकन फिश ईगलकडून प्रेरणा घेऊया. हा पक्षी त्याच्या तीव्र दृष्टिकोनासाठी आणि भव्य उड्डाणासाठी ओळखला जातो. तो आपल्याला शिकवतो –

 

एकत्र उंच भरारी घ्या,

क्षितिजाचा वेध घ्या,

आणि संधींसाठी निर्भयतेने पुढे जा!

 

मित्रांनो,

2018 मध्ये मी आफ्रिकेसोबत आमच्या संबंधांचे दहा सिद्धांत मांडले होते. आज मी भारताच्या त्या पूर्ण बांधिलकीची पुनःपुष्टी करतो. हे सर्व परस्पर सन्मान, समता आणि सहलाभावर आधारित आहेत. आमचा हेतू स्पर्धा नाही, तर सहकार्य आहे. आपले ध्येय आहे- एकत्र निर्माण करणे; घेण्यासाठी नव्हे, तर एकत्र वाढण्यासाठी.

आफ्रिकेतील आमची विकास भागीदारी 12 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. पण तिची खरी किंमत सामायिक प्रगती आणि उद्दिष्टात आहे. आम्ही स्थानिक कौशल्य निर्माण करतो, स्थानिक रोजगार तयार करतो आणि स्थानिक नवोपक्रमांना पाठिंबा देतो.

आमचा विश्वास आहे की आफ्रिका केवळ कच्च्या मालाचा स्रोत राहू नये. आफ्रिकेने मूल्यनिर्मिती आणि शाश्वत विकासाचे नेतृत्व करावे. म्हणूनच आम्ही औद्योगिकीकरणासाठी आफ्रिकेच्या ‘अजेंडा 2063’ ला पूर्ण पाठिंबा देतो. आम्ही संरक्षण व सुरक्षा क्षेत्रात आमचे सहकार्य वाढवण्यास तयार आहोत. भारताला जागतिक घडामोडींमध्ये आफ्रिकेची भूमिका महत्त्वाची वाटते. जी20 अध्यक्षपदाच्या काळात भारताने आफ्रिकेच्या आवाजाचे समर्थन केले. आणि आम्ही गर्वाने आफ्रिकन युनियनला जी20 चा कायम सदस्य म्हणून स्वागत केले.

 

मित्रांनो,

भारत आज आपल्या विकासाबरोबरच जगाच्या स्वप्नांना दिशा देत आहे. आणि यामध्ये आमचा भर ‘ग्लोबल साउथ’देश यावर आहे.

20व्या शतकात, भारताच्या स्वातंत्र्याने एक ठिणगी पेटवली – जी जगभरातील आफ्रिकेतील देखील स्वातंत्र्य चळवळींना प्रेरणा देणारी ठरली. 21व्या शतकात, भारताचा विकास एक प्रकाश देतो. जो दाखवतो की ‘ग्लोबल साउथ’ उदयास येऊ शकतो, नेतृत्व करू शकतो, आणि स्वतःचे भविष्य घडवू शकतो. संदेश स्पष्ट आहे, तुम्ही तुमच्या अटींवर तुमची ओळख न गमावता यशस्वी होऊ शकता.

हा भारताचा संदेश आहे, की तुम्ही तुमच्या मार्गावर चालून, तुमची संस्कृती आणि प्रतिष्ठा जपत, यश प्राप्त करू शकता.

हा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी, आपल्याला एकत्र कृती करावी लागेल. चला असे भविष्य निर्माण करूया जे ठरेल –

सत्तेने नव्हे, तर भागीदारीने.

प्रभुत्वाने नव्हे, तर संवादाने.

बहिष्कृतीने नव्हे, तर समतेने.

हीच आपल्या सामायिक दृष्टिकोनाची भावना असेल –

‘स्वातंत्र्याकडून भविष्याकडे’ – स्वातंत्र्य ते समृद्धी, संकल्प ते सिद्धी.

स्वातंत्र्याच्या ठिणगीपासून सामायिक प्रगतीच्या प्रकाशापर्यंत, चला ही वाट एकत्र चालूया. दोन स्वातंत्र्यलढ्यांतून जन्मलेली राष्ट्रे म्हणून, आपण आता सन्मान, समता आणि संधींनी भरलेले भविष्य निर्माण करूया. केवळ आपल्या जनतेसाठी नाही, तर संपूर्ण मानवतेसाठी.

चला, शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी भागीदार म्हणून पुढे जाऊया. आपल्या पुढच्या पिढ्यांनी केवळ आपले स्वातंत्र्यच नाही, तर आपण एकत्रितपणे घडवलेले भविष्य देखील वारसा म्हणून मिळवावे.

आज मी इथे उभा आहे, आणि मला आशेने भरून आले आहे. भारत आणि नामीबिया संबंधांचे सर्वात उज्ज्वल दिवस आपल्यासमोर आहेत.

 

मित्रांनो,

2027 क्रिकेट विश्वचषकाचे सह-आयोजन यासाठी नामीबियाला खूप खूप शुभेच्छा! आणि जर तुमच्या ईगल्सना क्रिकेटसंदर्भात काही टिप्स हव्या असतील, तर कुणाला संपर्क करायचा हे तुम्हाला माहित आहेच!

पुन्हा एकदा या सन्मानासाठी धन्यवाद.

तांगी ऊनेने! .

***

JPS/SN/NG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2143967)