जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट नदी व्यवस्थापनावर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन


नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी नवोन्मेश आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यावर विशेष भर

Posted On: 09 JUL 2025 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जुलै 2025


नमामी  गंगे कार्यक्रमांतर्गत देशभरातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तंत्रज्ञान आणि नवोन्मेशाचा वापर करण्याबाबत चर्चा करण्यासाठी आज नवी दिल्ली येथे महत्वाची उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, नद्यांच्या सर्वसाधारण, तर लहान नद्यांच्या विशेष व्यवस्थापनातील तंत्रज्ञान आणि नवोन्मेशाचे भवितव्य या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

संबंधित गटांनी प्रदर्शित केलेली सांघिक भावना, तंत्रज्ञान विषयक नवोन्मेश आणि सखोल वैज्ञानिक ज्ञान, याची केंद्रीय मंत्र्यांनी प्रशंसा केली. त्यांनी या संशोधनाच्या निकालांचे प्रत्यक्ष कृतीयोग्य उपायांमध्ये रूपांतर करण्याच्या महत्त्वावर भर दिला. सरकारच्या, “अविरल और निर्मल गंगा” या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करून, पाटील यांनी सर्व भागधारकांना या उपक्रमाच्या अंमलबजावणीला गती देण्याचे आणि महत्त्वाच्या नदी प्रणालींमध्ये त्याचा विस्तार करण्याचे निर्देश दिले, ज्यामुळे देशाचे स्वच्छ, निरोगी आणि जल-सुरक्षित भविष्य निश्चित होईल. 

हे केंद्र केवळ व्यावहारिक संशोधनाचे नेतृत्व करणार नसून, जल क्षेत्रातील स्टार्टअप्सना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देणारे केंद्र म्हणून काम करेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांना देण्यात आली. शहरी नदी व्यवस्थापन योजना, डिजिटल ट्विन, एआय-आधारित भू-स्थानिक मॉडेलिंग, पाण्याची गुणवत्ता सुधारणे आणि प्लास्टिकसारख्या नव्या प्रदूषकांवर प्रक्रिया, या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. नदी संवर्धनासाठी विज्ञान आणि नवोन्मेशाच्या नव्या सीमा खुल्या करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.


S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2143495)