राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या (IVRI) दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती

Posted On: 30 JUN 2025 12:40PM by PIB Mumbai

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  आज (30 जून 2025) उत्तर प्रदेशातील बरेली येथे भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या (IVRI) दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिल्या..

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, 'ईशावास्यमिदं सर्वम्' या जीवनमूल्यावर आधारित आपली संस्कृती सर्व सजीवांमध्ये देवाचे अस्तित्व पाहते. आपले देव आणि ऋषीमुनी प्राण्यांशी संवाद साधत असत, ही श्रद्धा देखील याच विचारावर आधारित आहे.

मानवाचे जंगल आणि वन्यजीवांशी सह-अस्तित्वाचे नाते आहे असे राष्ट्रपतींनी नमूद केले. अनेक प्रजाती एकतर नामशेष झाल्या आहेत किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जैवविविधता आणि पृथ्वीच्या आरोग्यासाठी या प्रजातींचे संरक्षण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. देवाने मानवाला दिलेली विचारशक्ती आणि आकलनक्षमता सर्व सजीवांच्या कल्याणासाठी वापरली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

इतर क्षेत्रांप्रमाणेच तंत्रज्ञानामध्ये पशुवैद्यकीय औषधोपचार आणि देखभालीमध्ये क्रांती घडवण्याची क्षमता आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. तंत्रज्ञानाचा वापर देशभरातील पशुवैद्यकीय रुग्णालयांना सक्षम करू शकतो. जीनोम एडिटिंग, भ्रूण हस्तांतरण तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बिग डेटा ऍनालिटिक्स यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवू शकतो. त्यांनी IVRI सारख्या संस्थांना प्राण्यांसाठी स्वदेशी आणि कमी खर्चाचे उपचार आणि पोषण शोधण्याचे आवाहन केले. ज्या औषधांचे दुष्परिणाम केवळ प्राण्यांवरच नाही तर मनुष्य आणि पर्यावरणावरही होतात, अशा औषधांना पर्याय शोधले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.

निरागस आणि मुक्या प्राण्यांवरील उपचार आणि त्यांचे कल्याण हे क्षेत्र आपले करिअर म्हणून निवडल्याबद्दल राष्ट्रपतींनी IVRI च्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. जीवन आणि करिअर यांच्याबाबतीत कधी द्विधा मनःस्थिती निर्माण झाल्यास, त्या प्राण्यांचा विचार करा असा सल्ला त्यांनी दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्याचे आणि पशुविज्ञान क्षेत्रातील विविध शाखांमध्ये स्टार्टअप सुरू करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी, कृपया येथे क्लिक करा.

***

SushamaK/ShaileshP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2140735)