सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने  प्रा. पी. सी महालनोबिस यांच्या 132व्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाची 75 वर्षे' या संकल्पनेसह 19 वा सांख्यिकी दिन केला  साजरा

Posted On: 29 JUN 2025 7:03PM by PIB Mumbai

 

सांख्यिकी आणि आर्थिक नियोजन क्षेत्रात दिवंगत प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत, भारत सरकारने 29 जून हा त्यांचा जन्मदिन सांख्यिकी दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र विकासाचे धोरण ठरवण्यात सांख्यिकीच्या महत्त्वाच्या भुमिकेविषयी विशेषतः तरुण पिढीमध्ये जनजागृती करणे हे या दिवसाचे प्राथमिक उद्दीष्ट आहे.

नवी दिल्लीत आज डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये 19 व्या सांख्यिकी दिनाचा उत्सव आयोजित करण्यात आला होता.  'राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाची 75 वर्षे' ही 19 व्या सांख्यिकी दिनाची संकल्पना असून ती, देशाच्या सांख्यिकी प्रणालीला बळकटी देणाऱ्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाचा सातत्यपूर्ण वारसा आणि प्रभाव अधोरेखित करते.

या समारंभाला, केंद्रीय राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) राव इंद्रजीत सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यांनी आपल्या भाषणात, प्राध्यापक महालनोबिस यांना आदरांजली वाहिली आणि सांख्यिकी दिन साजरा करणे आणि राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाची 75 वर्षे  (NSS) या दुहेरी प्रगतीशील घटनेचे महत्त्व अधोरेखित केले.

रिअल टाईम  माहिती निरीक्षणासाठी तांत्रिक साधनांद्वारे सांख्यिकी प्रणालीतील होत असलेल्या परिवर्तनाबद्दल त्यांनी भाष्य केले. अद्ययावत नमुना गोळा करण्याचे तंत्र, एकात्मिक सर्वेक्षण आराखडा आणि आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगतता यांसारख्या कार्यप्रणालींच्या सुधारणांच्या गरजेवर त्यांनी भर दिला.  राज्य सरकारशी चर्चा आणि क्षमता-बांधणी उपक्रमांद्वारे सर्वसमावेशक सहभागासाठी मंत्रालयाची वचनबद्धता त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणच्या 75 वर्षांच्या वारशाचे प्रतीक असलेले नाणे आणि एक टपाल तिकिट, इतर प्रकाशनांसह जारी करण्यात आले.

हा अहवाल सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MoSPI) (www.mospi.gov.in) संकेतस्थळावर पाहाता येईल.

अधिकृत सांख्यिकीची माहितीची सुलभता वृद्धिंगत करण्यासाठी GoIStat हे मोबाईल अँप देखील यावेळी लॉन्च करण्यात आले, ज्यामुळे अधिकृत सांख्यिकी उत्पादनांची सुलभता आणि सहभाग सुधारेल.

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणच्या प्रारंभापासूनच्या प्रवासाचे वर्णन करणाऱ्या माहितीपटाने, उद्घाटनानंतर आयोजित तांत्रिक सत्राची सुरुवात झाली.

या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्रालये आणि विभागातील वरिष्ठ अधिकारी, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील, संयुक्त राष्ट्र एजन्सी सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी आणि इतर भागधारकांसह सुमारे 700 सहभागींनी भाग घेतला. या कार्यक्रमात मंत्रालयाच्या उपक्रमांवर आधारीत एक माहितीपटही दाखवण्यात आला.

***

N.Chitale/VSS/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2140670)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil