सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभता मजबूत करण्यासाठी सरकारने ‘सुगम्य भारत’ ॲपचे केले नूतनीकरण
सरकारी उपक्रम आणि योजनांबद्दल रिअल-टाइम माहिती प्रदान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता-संचालित चॅटबॉटसह हे ॲप बनले अधिक सरल आणि वापरकर्ता-अनुकूल
Posted On:
27 JUN 2025 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जून 2025
भारतातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभता वाढविण्याकरिता समर्पित भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम, सुगम्य भारत ॲप (एसबीए) अलीकडेच अधिक वापरकर्ता-अनुकूल आणि प्रभावी अनुभव प्रदान करण्यासाठी सुधारित करण्यात आले आहे.
ॲपच्या अलिकडच्या सुधारणांमध्ये अनेक सुधारित वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत, ज्यात पुढील बाबींचा समावेश आहे:
- अधिक सरल आणि वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस
- वापरकर्त्यांना रिअल टाइममध्ये मदत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता-संचालित चॅटबॉट सहयोग
- सुलभतेशी संबंधित नवीन उपक्रमांबद्दल परिपत्रके आणि अधिसूचना
- दिव्यांग व्यक्तींसाठी शासकीय योजना आणि इतर उपयुक्त संसाधनांचे एकत्रीकरण
25.06.2025 पर्यंत, ॲपचे एकूण 14,358 नोंदणीकृत वापरकर्ते असून अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर 83,791 ॲप डाउनलोड झाले आहेत (यापैकी 82,291 अँड्रॉइडवर तर 1500 आयओएसवर). सुगम्य भारत ॲप सध्या अँड्रॉइड डिव्हाइससाठी गुगल प्ले स्टोअरवर आणि आयओएस प्लॅटफॉर्मसाठी अॅपल ॲप स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाने (DEPwD) 2021 मध्ये लाँच केलेले हे ॲप नागरिकांना सार्वजनिक पायाभूत सुविधा, वाहतूक तसेच माहिती आणि संवाद तंत्रज्ञान (ICT) प्रणालींमधील सुलभतेतील समस्यांची तक्रार नोंदवण्यासाठी एक आवश्यक व्यासपीठ म्हणून काम करते.
वापरकर्ते सुलभतेतील अडथळे असलेल्या ठिकाणांचे जिओ-टॅग केलेले फोटो सहजपणे अपलोड करू शकतात, ज्यामुळे अधिकाऱ्यांना त्वरित सुधारणात्मक कारवाई करता येते. या ॲपच्या प्रारंभापासून आतापर्यंत एकूण 2705 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी 1897 तक्रारींचे यशस्वी निराकरण करण्यात आली आहे. हे सर्वांसाठी समावेशक वातावरण निर्माण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभाग नागरिकांना सुलभतेतील आव्हाने नोंदवण्यात आणि भारताच्या सरकारच्या अडथळामुक्त दृष्टिकोनाला पाठिंबा देण्यासाठी सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन करत आहे.
* * *
S.Tupe/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2140302)