नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते भारतातील पहिल्या सागरी एनबीएफसी - सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एसएमएफसीएल) चे उद्घाटन

Posted On: 26 JUN 2025 5:58PM by PIB Mumbai

 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद  सोनोवाल यांनी आज सागरी क्षेत्रातील भारतातील पहिली  बिगर -बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एसएमएफसीएल) चे उद्घाटन केले. पूर्वी सागरमाला डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड म्हणून ओळखली  जाणारी एसएमएफसीएल आता अमृत काल व्हिजन 2047 च्या अनुषंगाने भारताच्या सागरी पायाभूत सुविधांच्या विकासात परिवर्तनकारी भूमिका बजावण्यास सज्ज आहे.

एसएमएफसीएल - एक मिनी रत्न, श्रेणी-I केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे ज्याची  19 जून, 2025 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) मध्ये एक बिगर -बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) म्हणून औपचारिकपणे नोंदणी झाली आहे.

या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री सोनोवाल म्हणाले, “सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडची एनबीएफसी म्हणून नोंदणी हा  भारताच्या सागरी प्रवासातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, आम्ही आपल्या  अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख स्तंभ म्हणून सागरी क्षेत्राला बळकट करण्यासाठी निर्णायक पावले उचलत आहोत.

एसएमएफसीएल महत्त्वपूर्ण वित्तपुरवठामधील  तफावत भरून काढेल आणि क्षेत्र-निहाय आर्थिक उपाय प्रदान करेल.  बंदरे, एमएसएमई, स्टार्टअप आणि संस्थांना सक्षम बनवेल. यामुळे देशातील सागरी उद्योगाची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे. हे पाऊल सागरी अमृत काल  व्हिजन 2047आणि भारताला एक आघाडीची जागतिक सागरी शक्ती आणि विकसित भारत बनवण्याच्या आमच्या सामायिक ध्येयाशी  सुसंगत आहे.

***

S.Kakade/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2140019)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil