गृह मंत्रालय
छत्तीसगडमधील रायपूरमध्ये केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ(NFSU) आणि केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा (CFSL) इमारतींची पायाभरणी करण्यात आली आणि रायपूरमधील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या(NFSU)तात्पुरत्या इमारतीचे दूरस्थ प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.
प्रविष्टि तिथि:
22 JUN 2025 7:32PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहम आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ(NFSU) आणि केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा (CFSL) इमारतींची पायाभरणी करण्यात आली आणि रायपूरमधील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या(NFSU)तात्पुरत्या इमारतीचे दूरस्थ प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी,छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, केंद्रीय गृह सचिव तसेच गुप्तचर विभागाचे संचालक यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आपल्या भाषणात म्हणाले की, छत्तीसगडच्या फौजदारी व्यवस्थेच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी तीन नवे उपक्रम सुरू होत आहेत. येत्या काळात हे तीन उपक्रम, छत्तीसगडसाठी नव्हे तर मध्य भारतातील संपूर्ण फौजदारी न्याय व्यवस्थेसा्ठी पाया म्हणून काम करतील.

राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या(NFSU) स्थापनेपासून, अतिशय कमी कालावधीत 16 कॅम्पस सुरू करण्यात आले आहेत - त्यापैकी 7 शाखा कार्यरत झाल्या असून आणि 9 शाखांना मंजुरी मिळाली आहे तर 10 अतिरिक्त शाखा प्रस्तावित आहेत, असे शहा म्हणाले.

मोदी सरकार देशभरातल्या 26 प्रमुख ठिकाणी राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या(NFSU)विस्ताराची योजना आखत आहे. या विस्तारीत शाखांचा संपूर्ण विकास झाल्यानंतर येत्या काही वर्षात भारतात दरवर्षी 32,000 न्यायवैद्यक तज्ज्ञ तयार होतील असे शहा म्हणाले. गृहमंत्र्यांनी असेही नमूद केले की, एका सर्वेक्षणानुसार, जागतिक न्यायवैद्यक तंत्रज्ञानाची बाजारपेठ सध्या 20 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे आणि 13 % वार्षिक चक्रवाढ वाढीच्या दराने (CAGR) त्यात वाढ होत असून ती,2036 पर्यंत 55 अब्ज डॉलर्सपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे.

या बाजारपेठेत भारताचा 9% टक्के वाटा असेली अशी अपेक्षा असल्याचे शहा म्हणाले.
***
S.Patil/VSS/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2138787)
आगंतुक पटल : 20