आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या विशाखापट्टणम येथून 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य समारंभाचे करणार नेतृत्व


21 तारखेला योग संगमसाठी 11 लाखांहून अधिक कार्यक्रमांची नोंदणी

Posted On: 20 JUN 2025 5:40PM by PIB Mumbai

 

अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या-21 जून 2025 रोजी देशभरात भव्यतेने साजरा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून राष्ट्रीय कार्यक्रमाचे नेतृत्व करणार आहेत. या प्रमुख कार्यक्रमात 3 लाखांहून अधिक सहभागींसह पंतप्रधान कॉमन योगा प्रोटोकॉल (सीवायपी) सादर करतील. केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हेही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. भारताच्या जागतिक कल्याण दृष्टिकोनाला अनुसरून या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

या मुख्य कार्यक्रमाशी मेळ राखत देशातील  10 लाख ठिकाणी योगसंगम उपक्रम राबवला जाणार आहे.  सकाळी 6:30 ते  7:45 या वेळेत सामूहिक योग प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली  आहेत. या उपक्रमाला देशाच्या कानाकोपऱ्यातून अभूतपूर्व सहभाग मिळण्याची अपेक्षा  आहे. 

आंध्र प्रदेश राज्यातील एका लाखाहून अधिक ठिकाणी दोन कोटींहून जास्त लोक योग सत्रांमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. आंध्र प्रदेश सरकार या प्रसंगाचे औचित्य साधून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न करत असून तसा समन्वय साधत आहे. याव्यतिरिक्त, आंध्र प्रदेश सरकारकडून नोंदणीकृत सहभागींना 50लाखांहून अधिक योग प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. त्यामुळे यंदाचा हा आंतरराष्ट्रीय योग दिन भारताच्या आरोग्य आणि निरामयतेच्या  दिशेने चाललेल्या वाटचालीतील ऐतिहासिक क्षण बनेल.

विशाखापट्टणममधील उत्सवाचा भाग म्हणून आज आंध्र विद्यापीठात अनोखा सूर्यनमस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात सुमारे 25,000 आदिवासी मुलांनी 108 मिनिटांत 108 सूर्यनमस्कार घातले.

दिल्ली देखील राष्ट्रीय उत्सवात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी सज्ज आहे. 21 जून रोजी, राजधानीतील 109 ठिकाणी योग कार्यक्रम आयोजित केले जातील.

एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग या संकल्पनेवर आधारित यंदाचा योग दिन कल्याणकारी एकात्मिक दृष्टिकोन देणारा ठरणार आहे. "सर्वे सन्तु निरामयः " (सर्व रोगमुक्त होऊ देत) या भारतीय नीति तत्त्वातून मानव आणि ग्रहांच्या आरोग्याच्या परस्परसंबंधावर यामध्ये भर दिला आहे.

लोकसहभागासाठी  घेण्यात आलेल्या 10  वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाना  देश-परदेशातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. 21जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी देशात एक लाख नोंदणीचे उद्दिष्ट होते. त्यापेक्षा कितीतरी अधिक म्हणजे 11 लाखांहून अधिक संस्था आणि गटांनी आयुष मंत्रालयाच्या योग पोर्टलद्वारे आपापल्या ठिकाणी योग संगम कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे.

योग दिन चळवळीच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम हा एक मैलाचा दगड असून आयुष मंत्रालयाने 100 दिवसांत 10  कार्यक्रमांची संकल्पना आखली. त्यात हे समाविष्ट आहे:

योग संगम:

योग बंधन:

हरित योग

योग पार्क:.

योग सामवेश:

योग प्रभाव:

योग कनेक्ट:

योग अनप्लग्ड:

योग महाकुंभ:

संयोग पद्धती.

जागतिक स्तरावर भारतीय दूतावास आणि सांस्कृतिक केंद्रे सक्रियपणे योग प्रात्यक्षिके आणि जागरूकता मोहिमा राबवत आहेत.

***

N.Chitale/P.Jambhekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2138188)