माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'देसी ऊन' ने जागतिक स्तरावर भारताच्या अ‍ॅनिमेशन यशाचे केले नेतृत्व


वेव्हज 2025 च्या विजेत्याने अ‍ॅनेसी इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हल, फ्रान्समध्ये मिळवले यश

इतर आंतरराष्ट्रीय सन्मानांसह कान्स लायन्स 2025 मध्ये स्टुडिओ एकसॉरससाठी निवडक सूचीमध्ये मिळवले स्थान

Posted On: 18 JUN 2025 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2025

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने वेव्हज 2025 चा भाग म्हणून  सुरू केलेले क्रिएट इन इंडिया चॅलेंज, भारताच्या सर्जनशील प्रतिभेला ओळखण्यासाठी आणि जागतिक स्तरावर त्याला वाव देण्यासाठी एक परिवर्तनकारी व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. प्रसिद्ध अ‍ॅनिमेशन चित्रपट निर्माते सुरेश एरियात यांचा चित्रपट देसी ऊन हा त्यांच्या उत्कृष्ट यशोगाथांपैकी एक आहे, ज्याने फ्रान्समधील अ‍ॅनेसी इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हल 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट कमिशन्ड चित्रपटासाठी ज्युरी पुरस्कार जिंकून भारतीय अ‍ॅनिमेशनला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवून दिली आहे. अ‍ॅनिमेशनसाठी जगातील सर्वात प्रतिष्ठित मंच  म्हणून व्यापकपणे ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवातील  हे दुर्मिळ आणि अविस्मरणीय यश  भारतीय अ‍ॅनिमेशनला जगाच्या नकाशावर स्थान मिळवून देते.

भारताच्या AVGC-XR परिसंस्थेला  (अ‍ॅनिमेशन, व्हीएफएक्स , गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअ‍ॅलिटी) चालना देणे हा उद्देश असलेल्या क्रिएट इन इंडिया चॅलेंज या उपक्रमात  60 हून अधिक देशांमधून 32 क्युरेटेड आव्हानांमधून प्रवेशिका आल्या, ज्यांनी भारतीय संस्कृतीत रुजलेल्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अभिनव  कथाकथन सादर केले. 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित वेव्ह्ज 2025 मध्ये खास तयार केलेल्या क्रिएटोस्फीअरमध्ये 750 हून अधिक अंतिम स्पर्धकांनी सादरीकरण केले.

'देसी ऊन ' ला अलीकडेच 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज' अंतर्गत भारतातील आघाडीच्या अ‍ॅनिमेशन आणि डिझाइन मंच  'वेव्हज अवॉर्ड्स ऑफ एक्सलन्स 2025' मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार  मिळाला. अ‍ॅनेसी सन्मानाव्यतिरिक्त, या चित्रपटाला कान्स लायन्स 2025 मध्ये फिल्म क्राफ्ट लायन्स श्रेणीमध्ये देखील निवडण्यात आले असून भारताच्या अ‍ॅनिमेशन उद्योगासाठी एक उल्लेखनीय   कामगिरी ठरली  आहे.

सुरेश एरियट यांची कथाकथनाची शैली  आणि स्टुडिओ एकसॉरसच्या कलात्मकतेला  अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत:

एआयसीपी शो विनर 2025 - हा चित्रपट न्यूयॉर्कमधील म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट (एमओएमए) येथे संग्रहित केला जाईल, असा सन्मान जो सर्वात प्रभावी जागतिक कलाकृतीसाठी राखीव आहे.

गुड अ‍ॅड्स मॅटर 2025 मध्ये 2 सुवर्णपदके - सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेशन चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेशन + सीजीआय इंटिग्रेशनसाठी मान्यता.

2 ब्लू एलिफाट आणि 1 बेबी ब्लॅक एलिफंट - प्रतिष्ठित क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्समध्ये.

डी अँड एडी वुडन पेन्सिल विजेता - जागतिक जाहिरातींमधील सर्वोत्तम डिझाइन साठी सन्मान.

'देसी ऊन' हा चित्रपटापेक्षा खूप काही आहे, तो एक सांस्कृतिक दृष्ट्‍या महत्वाचा टप्पा आहे. भारतीय नीतिमत्तेत खोलवर रुजलेले, तरीही जागतिक स्तरावर प्रतिध्वनीत होणार्‍या  अ‍ॅनिमेशनद्वारे व्यक्त झालेले, मौलिकता आणि तांत्रिक कौशल्याने सांगितल्या जाणाऱ्या स्थानिक कथा कशा प्रकारे विविध खंडांमधील प्रेक्षकांची मने जिंकू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.

क्रिएट इन इंडिया चॅलेंज 2025 चे पर्यवेक्षण करणारे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अधिकारी, अनुभव सिंह म्हणाले, “भारत सरकार AVGC-XR क्षेत्राचे संगोपन करण्यासाठी वचनबद्ध आहे. वेव्हसारखे व्यासपीठ आणि क्रिएट इन इंडिया चॅलेंजसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून, भारताकडे जागतिक कंटेंट क्रिएशन पॉवरहाऊस म्हणून पाहण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी सुसंगत अशा सर्जनशील उत्कृष्टतेवर प्रकाश टाकण्याचे आमचे उद्दीष्ट आहे.”

आसिफा इंडियाचे अध्यक्ष संजय खिमेसरा म्हणाले, “हा विजय केवळ सुरेश इरियात यांचा नसून,  भारताचा आहे. 'देसी ऊन' हा चित्रपट भारताचा आत्मा प्रत्येक फ्रेम मध्ये प्रतिबिंबित करतो, जो विनोद, भावना आणि कलात्मकतेचे मिश्रण आहे. तो भारतीय निर्मात्यांच्या नवीन पिढीला मोठा विचार करण्यासाठी, आपले मूळ घट्ट धरून राहण्यासाठी आणि जागतिक पातळीवरील ध्येय ठेवण्यासाठी प्रेरित करतो."

वेव्हज उत्कृष्टता पुरस्कार:

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ASIFA इंडियाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या WAVES द्वारे अॅनिमेशन, व्हीएफएक्स, डिझाइन आणि उदयोन्मुख माध्यमांमधील सर्वोत्तम कलाकारांना सन्मानित केले जाते, जे भारताच्या सर्जनशील परीप्रेक्ष्याची विविधता आणि क्षमता साजरी करतात.

आसिफा इंडिया:

युनेस्को-समर्थित जागतिक संस्था, ASIFA इंटरनॅशनलचा भारतीय विभाग असलेला आसिफा इंडिया, अॅनिमेशन कलेसाठी समर्पित आहे आणि महोत्सव, चर्चासत्रे, मार्गदर्शन आणि पुरस्कारांद्वारे सर्जनशील देवाणघेवाण, क्षमता विकास आणि ओळख मिळवून देतो.

S.Bedekar/S.Kane/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2137530)