गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी लखनौ येथे उत्तर प्रदेश पोलिसातील 60,244 नागरी पोलिस शिपायांना नियुक्ती पत्रे केली प्रदान
Posted On:
15 JUN 2025 5:16PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज उत्तर प्रदेशातील लखनौ येथे उत्तर प्रदेश पोलिसातील 60,244 नागरी पोलिस शिपायांना नियुक्ती पत्रे प्रदान केली. या प्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आज 60,000 हून अधिक तरुण भारतातील सर्वात मोठ्या पोलिस दलाचा अविभाज्य भाग बनणार आहेत” असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात सांगितले. उत्तर प्रदेश पोलिस हे संपूर्ण देशातील सर्वात मोठे पोलिस दल आहे, मात्र गेल्या काही वर्षांपूर्वी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत होती, असे ते म्हणाले. 2017 मध्ये योगी आदित्यनाथ राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिस दलाने पुन्हा एकदा प्रगतीचा मार्ग धरला आहे, असेही त्यांनी सांगितले.

नव्याने निवड झालेल्या तरुणांमध्ये 12,000 हून अधिक तरुणी आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास, उत्साह आणि आनंद पाहून विशेष समाधान मिळते, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. मोदी सरकारने महिलांसाठी केलेल्या आरक्षणाच्या तरतुदी उत्तर प्रदेशात 100% अंमलात आणल्या जात आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले. हे तरुण अशा वेळी उत्तर प्रदेश पोलिसांचा भाग बनत आहेत जेव्हा राज्य सुधारणांकडे वाटचाल करत आहे, असे त्यांनी सांगितले. आता उत्तर प्रदेशला केवळ विकसितच नाही तर सुरक्षित देखील बनवण्याची जबाबदारी या तरुणांवर आहे, असे ते म्हणाले.
GNZX.JPG)
आज 4 लाख सदस्य संख्या असलेल्या देशातील सर्वात मोठ्या पोलिस दलात 60,000 हून अधिक तरुण सामील होत आहेत, असे त्यांनी सांगितले. गुंडगिरी करणाऱ्यांना आणि माफियांना पोलिसांची भीती वाटली पाहिजे, तर गरीब, दलित, मागास आणि आदिवासींना पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आपले रक्षक दिसले पाहिजेत, यावर अमित शहा यांनी भर दिला.
JFRA.JPG)
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2136530)