पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांचे सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौर्‍यापूर्वीचे निवेदन

Posted On: 15 JUN 2025 7:00AM by PIB Mumbai

 

आज मी सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौर्‍यासाठी रवाना होणार आहे.

15-16 जून दरम्यान, मी सायप्रस प्रजासत्ताकाचा दौरा करणार आहे. हा दौरा राष्ट्राध्यक्ष महामहिम निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांच्या निमंत्रणावरून होत आहे. सायप्रस हा भूमध्य सागरी क्षेत्रातील आणि युरोपियन युनियनमधील भारताचा निकटचा मित्र व महत्त्वाचा भागीदार आहे. या भेटीत ऐतिहासिक संबंध दृढ करण्याची आणि व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा, तंत्रज्ञान तसेच जनतेतील परस्पर संबंध वाढवण्याची संधी मिळणार आहे.

सायप्रसहून मी कॅनडा येथील कानानास्किस येथे जी7 शिखर परिषदेसाठी रवाना होईल. ही भेट पंतप्रधान महामहिम मार्क कार्नी यांच्या आमंत्रणावरून होत आहे. ही परिषद जागतिक स्तरावरील अत्यावश्यक मुद्दे आणि ग्लोबल साउथच्या प्राधान्यक्रमांवर विचारमंथनाची संधी देईल. मी भागीदार देशांच्या नेत्यांसोबत संवाद साधण्यासही उत्सुक आहे.

18 जून रोजी मी क्रोएशिया प्रजासत्ताकाच्या दौर्‍यावर असून तेथे राष्ट्राध्यक्ष जोरान मिलानोविच आणि पंतप्रधान आंद्रे प्लेंकोविच यांच्या भेटीसाठी उत्सुक आहे. भारत आणि क्रोएशिया यांच्यात शतकानुशतके सांस्कृतिक संबंध आहेत. हा कोणत्याही भारतीय पंतप्रधानाचा क्रोएशियाचा पहिला दौरा असून, परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करेल.

हा तीन देशांचा दौरा हा भारतावरील सीमापार दहशतवादाविरोधातील लढ्यात भागीदार देशांनी दिलेल्या दृढ पाठिंब्याबद्दल आभार मानण्याची संधीही आहे, तसेच दहशतवादाच्या सर्व प्रकारांवर आणि स्वरूपांवर उपाय शोधण्यासाठी जागतिक पातळीवर समज निर्माण करण्याचा एक प्रयत्नही आहे.

***

N.Deshmukh/N.Gaikwad/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2136443)