पंतप्रधान कार्यालय
इस्रायलच्या पंतप्रधानांनी प्रदेशातील बदलत्या परिस्थितीबाबत पंतप्रधानांशी केली चर्चा
प्रविष्टि तिथि:
13 JUN 2025 8:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी प्रदेशातील बदलत्या परिस्थितीबद्दल चर्चा केली.
चर्चेदरम्यान, पंतप्रधान नेतान्याहू यांनी मोदी यांना अलीकडील घडामोडींबद्दल माहिती दिली, तर पंतप्रधान मोदी यांनी परिस्थितीबद्दल भारताची चिंता व्यक्त केली. प्रदेशात शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर पुनर्स्थापित करण्याच्या तातडीच्या गरजेवर मोदी यांनी भर देत जागतिक शांतता प्रयत्नांप्रति भारताच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला.
त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये लिहिले:
“इस्रायलचे पंतप्रधान @netanyahu यांचा दूरध्वनी आला. त्यांनी मला तेथील बदलत्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. मी भारताकडून चिंता व्यक्त केली आणि प्रदेशात शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर पुनर्स्थापित करण्याच्या गरजेवर भर दिला.”
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2136269)
आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam