पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी विविध देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या विविध शिष्टमंडळांच्या सदस्यांची भेट घेतली
दहशतवादावरील भारताची भूमिका ठामपणे मांडल्याबद्दल पंतप्रधानांनी शिष्टमंडळांची केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
10 JUN 2025 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जून 2025
विविध देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या विविध शिष्टमंडळांच्या सदस्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. भारताची शांततेविषयी वचनबद्धता आणि दहशतवादाचा धोका समूळ नष्ट करण्याची आवश्यकता अतिशय सविस्तरपणे मांडण्याची महत्त्वाची भूमिका या शिष्टमंडळांनी बजावली.जागतिक मंचांवर भारताचा आवाज बुलंद करण्यासाठी केलेल्या त्यांच्या समर्पित वृत्तीबद्दल मोदी यांनी या शिष्टमंडळांचे कौतुक केले.
एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:
“विविध देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या शिष्टमंडळांच्या सदस्यांना भेटलो. त्यांनी शांततेप्रति भारताची वचनबद्धता आणि दहशतवादाचा धोका समूळ नष्ट करण्याची गरज अतिशय सविस्तर पद्धतीने मांडली. त्यांनी ज्या प्रकारे भारताचा आवाज बुलंद केला, त्याबद्दल आम्हा सर्वांना त्यांचा अभिमान आहे.”
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2135526)
आगंतुक पटल : 4
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Khasi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada