शिक्षण मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक युवा वैज्ञानिक परिषद आणि जागतिक युवा अकादमीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन
Posted On:
10 JUN 2025 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जून 2025
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी हैदराबाद इथे जागतिक युवा वैज्ञानिक परिषद आणि जागतिक युवा अकादमीच्या (जीवायए) वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान भूषविले.
आपल्या भाषणात धर्मेंद्र प्रधान यांनी परिषदेत सहभागी झालेल्या जगभरातील तरुण शास्त्रज्ञांचे स्वागत केले. या कार्यक्रमात जीवायएमध्ये सहभागी झालेल्या ३० नवीन सदस्यांचे त्यांनी अभिनंदन केले. भारत आणि आयआयटी हैदराबादची कार्यक्रमाच्या आयोजनासाठी निवड केल्याबद्दल त्यांनी जीवायएचे आभार मानले. ही परिषद केवळ शास्त्रज्ञांची सभा नसून ती आशा, उद्देश आणि सामायिक भविष्याचा मंच आहे, असे ते म्हणाले.
प्रधान यांनी सांगितले की भारत विज्ञानाकडे सहानुभूतीपूर्ण, नैतिक आणि समतावादी दृष्टिकोनातून पाहतो. त्यांनी असेही नमूद केले की विज्ञान हे सर्वांसोबत वाटून घेतले गेले पाहिजे, भविष्यात पेटंट नव्हे तर भागीदारी महत्त्वाची ठरेल.

ते पुढे म्हणाले की सध्याचा काळ हा वैज्ञानिक, नवोन्मेषक आणि धोरणकर्त्यांसाठी सर्वाधिक अनुकूल आहे, ते एकत्र येऊन दुर्बल घटकांसाठी सक्षम उपाययोजना सुचवू शकतील आणि परिसंस्था उभारू शकतील. त्यांनी विश्वास व्यक्त केला की ही परिषद ज्ञानाचा प्रसार आणि मानवहितासाठी वाहून घेण्याचे व्यासपीठ ठरेल.
विकसित भारताचे स्वप्न साकारता येईल आणि मानवकेंद्रित विकासाला चालना मिळेल म्हणून प्रधान यांनी वैज्ञानिकांना उद्देश आणि सहसंवेदनेने सहकार्य करण्याचे आणि सहनिर्मिती करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात 60 देशांचे 135 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि 65 राष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी झाले असून हा खरोखरच विविधतेने समृद्ध आणि समावेशक मंच ठरला आहे. कार्यक्रमात जीवायएची वार्षिक सर्वसाधारण सभा देखील होत असून जागतिक वैज्ञानिक समुदायातील उदयोन्मुख नेत्यांमध्ये सखोल संवाद व धोरणात्मक चर्चेसाठी संधी निर्माण करण्यात आली आहे.

या परिषदेमध्ये पुढील मुख्य विषयांवर सत्रे आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत,
- पर्यावरणीय, सामाजिक आणि शासन (ईएसजी)
- जागतिक आरोग्यासाठी आरोग्य आणि पोषण
- इंडस्ट्री 5.0 – माणूस-यंत्र संबंधाची प्रगती
- नवोन्मेष आणि उद्योजकता - जागतिक परिदृश्य
* * *
S.Kane/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2135383)
Visitor Counter : 5