पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        कनानस्किस येथे आयोजित जी 7 परिषदेचे आमंत्रण देण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचा पंतप्रधानांना दूरध्वनी
                    
                    
                        
दोन्ही नेत्यांनी भारत आणि कॅनडामधील जनतेदरम्यान असलेल्या दृढ संबंधांची घेतली दखल
                    
                
                
                    Posted On:
                06 JUN 2025 7:12PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली 06 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी  कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला.
या संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचे अलीकडेच  झालेल्या  निवडणुकीतील यशाबद्दल अभिनंदन केले आणि या महिन्याच्या अखेरीस कनानस्किस येथे होणार असलेल्या जी 7 परिषदेचे आमंत्रण दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
दोन्ही नेत्यांनी भारत आणि कॅनडामधील जनतेदरम्यान असलेल्या दृढ संबंधांची दखल घेतली तसेच परस्परांबद्दलचा आदर आणि सामायिक स्वारस्यांच्या आधारे नव्या जोमाने एकत्र येऊन काम करण्याप्रती वचनबद्धतेला दुजोरा दिला.
जी 7 परिषदेत होणाऱ्या भेटीबद्दल उत्सुक आहोत अशी भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
एक्स मंचावरील  संदेशात पंतप्रधान मोदी लिहितात;
“कॅनडाचे पंतप्रधान @MarkJCarney यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून आनंद झाला. अलीकडेच निवडणुकीत त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि या महिन्याच्या अखेरीस  कनानस्किस येथे होणार असलेल्या जी7 परिषदेचे आमंत्रण दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. दोन्ही देशांतील जनतेच्या दृढ संबंधांनी बांधले गेलेले भारत आणि कॅनडा हे चैतन्यमय लोकशाही देश परस्परांबद्दलचा आदर आणि सामायिक स्वारस्यांच्या आधारे  नव्या जोमाने एकत्र येऊन काम करतील. जी 7 शिखर परिषदेत होणाऱ्या आमच्या भेटीसाठी उत्सुक आहे.”
 
***
S.Kane/S.Chitnis/P.Kor
*** 
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 2134696)
                Visitor Counter : 8
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam