पंतप्रधान कार्यालय
मध्यप्रदेशातील झाबुआ येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
पंतप्रधान राष्ट्रीय निवारण योजनेतून निधी जाहीर
Posted On:
04 JUN 2025 10:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2025
मध्य प्रदेशातील झाबुआ येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीस आराम पडो,अशी प्रार्थना मोदींनी केली आहे.
पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत पंतप्रधान राष्ट्रीय संकट निवारण योजनेतून जाहीर केली आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे :
"मध्य प्रदेशातील झाबुआ येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीमुळे मनापासून दुःख झाले आहे.ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रति मी संवेदना व्यक्त करतो तसेच जखमींना लवकर बरे वाटावे,अशी प्रार्थना. प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकास पंतप्रधान राष्ट्रीय संकट निवारण निधीतून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल तसेच जखमींनाही 50,000 रुपयांची मदत दिली जाईल:
पंतप्रधान @नरेंद्र मोदी"
S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2133983)
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam