केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय लोकसेवा आयोगाने सुरु केले नवीन ऑनलाइन ऍप्लिकेशन पोर्टल

Posted On: 28 MAY 2025 9:59PM by PIB Mumbai

नवी ‍‍दिल्ली, 28 मे 2025
 

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) ऑनलाइन माध्यमातून नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी नवीन पोर्टल सुरु केले आहे. यूपीएससी ऑनलाइन अर्जाच्या पोर्टलचे चार भाग असून, होम पेजवर 4 स्वतंत्र कार्डमध्ये ते त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी खाते उघडणे, सार्वत्रिक नोंदणी आणि कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म हे तीन विभाग सर्व परीक्षांसाठी समान असून, ते उमेदवारांना केव्हाही भरता येतील. चौथा परीक्षा विभाग, या ठिकाणी परीक्षेची सूचना, परीक्षा अर्ज आणि अर्जाची स्थिती पाहता येईल. परीक्षेच्या अधिसूचनेत दिलेल्या कालावधीत उमेदवारांनी या भागामध्ये केवळ परीक्षेशी संबंधित माहिती भरायची आहे.

या व्यवस्थेमुळे उमेदवारांना पहिले तीन भाग केव्हाही भरता येतील, आणि आवश्यकतेनुसार सूचना जारी करण्यात आल्यावर कोणत्याही यूपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरता येईल, जेणेकरून वेळेची बचत होईल आणि शेवटच्या क्षणी होणारी गडबड टाळता येईल.

सर्व अर्जदारांनी पुढील वेबसाइटवर नव्याने अर्ज भरून पोर्टलमध्ये आपली कागदपत्रे अपलोड करावीत:

https://upsconline.nic.in.

यापुढे जुने वन टाइम रजिस्ट्रेशन (ओटीआर) मॉड्यूल लागू होणार नाही.

उमेदवारांना अर्ज भरणे आणि कागदपत्रे अपलोड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी होम पेजवर तसेच सर्व प्रोफाइल / मॉड्यूलवर तपशीलवार सूचना उपलब्ध आहेत.

अर्जदारांना युनिव्हर्सल ऍप्लिकेशनमध्ये त्यांचे आधार कार्ड ओळखपत्र दस्तऐवज म्हणून वापरण्याची सूचना देण्यात येत आहे, जेणेकरून ओळखपत्र आणि इतर तपशीलांची सहज आणि सुलभ पडताळणी आणि प्रमाणीकरण करता येईल, आणि त्यानंतर ते सर्व परीक्षांसाठी कायमस्वरूपी आणि सामान्य रेकॉर्ड (दस्त ऐवज) म्हणून काम करेल.

नवीन ऍप्लिकेशन पोर्टल 28.05.2025 पासून सुरू करण्यात येत आहे.

28.05.2025 रोजी अधिसूचित होणाऱ्या सीडीएस परीक्षा-II, 2025 आणि एनडीए आणि एनए-II, 2025 साठीचे अर्ज नवीन ऑनलाइन अर्ज पोर्टलद्वारे स्वीकारले जातील.


S.Patil/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2132199)