कृषी मंत्रालय
विकसित कृषी संकल्प अभियानाची तयारी पूर्ण, शास्त्रज्ञ गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी साधणार संवाद
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह यांच्या उपस्थितीत 29 मे रोजी ओदिशातील पुरी येथून होणार अभियानाचा प्रारंभ
प्रविष्टि तिथि:
27 MAY 2025 6:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2025
केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पुढाकाराने सुरू होणाऱ्या देशव्यापी 'विकसित कृषी संकल्प अभियानाची' तयारी पूर्ण झाली आहे. या अभियानाचा प्रारंभ 29 मे रोजी पुरी (ओदिशा) च्या पवित्र भूमीवरून होईल, ज्यात केंद्रीय मंत्री शिवराज सिंह देखील सहभागी होतील. या 15 दिवसांच्या बृहद अभियानादरम्यान, चौहान सुमारे 20 राज्यांना भेट देतील आणि शेतकरी आणि शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्याशी थेट संवाद साधतील.
29 मे रोजी ओदिशाला भेट दिल्यानंतर 12 जूनपर्यंत चालणाऱ्या अभियानादरम्यान केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान जम्मू, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, आसाम, मेघालय, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली आणि छत्तीसगड येथे शेतकरी आणि वैज्ञानिक चमूंशी संवाद साधतील.
अभियानाच्या उद्दिष्टांमध्ये शेतकऱ्यांना विशिष्ट प्रदेशासाठी खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या प्रमुख पिकांशी संबंधित आधुनिक तंत्रांबद्दल जागरूक करणे, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या सरकारी योजना आणि धोरणांबद्दल त्यांना जागरूक करणे, मृदा आरोग्य कार्डमध्ये सुचविलेल्या विविध पिकांची निवड आणि संतुलित खतांचा वापर याबद्दल शेतकऱ्यांना जागरूक आणि शिक्षित करणे आणि शेतकऱ्यांकडून अभिप्राय घेणे समाविष्ट आहे जेणेकरून त्यांनी केलेल्या नवोपक्रमाची शास्त्रीय माहिती मिळवून संशोधनाची दिशा निश्चित करता येईल.
या काळात, शास्त्रज्ञांचे पथक गावांना भेट देईल आणि शेतकऱ्यांशी संवाद साधेल. या अभियानात देशभरातील सर्व 731 कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके), आयसीएआर च्या सर्व 113 संस्था, राज्यस्तरीय विभाग आणि कृषी, फलोत्पादन, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसायातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याबरोबरच प्रगतीशील शेतकरी आणि शेतीशी निगडित इतर लोक सहभागी होतील.
S.Kane/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2131721)
आगंतुक पटल : 29