आयुष मंत्रालय
78 व्या जागतिक आरोग्य सभेत भारताने जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपरिक औषध धोरणाप्रती आपल्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार
प्रविष्टि तिथि:
27 MAY 2025 5:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2025
जिनिव्हा येथे “आरोग्यासाठी एक जग” या संकल्पनेनुसार आयोजित 78 व्या जागतिक आरोग्य सभेत भारताने आरोग्यसेवेसाठी एकात्मिक दृष्टिकोनाचा भाग म्हणून पारंपरिक औषध प्रणालींना बळकट करण्याप्रती आपली दृढ वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. भारताच्या वतीने बोलताना, जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांचे स्थायी प्रतिनिधी अरिंदम बागची यांनी जागतिक आरोग्य संघटनेने नवीन जागतिक पारंपरिक औषध धोरण 2025-2034 स्वीकारल्याचे स्वागत केले. राष्ट्रीय आणि जागतिक आरोग्य आराखड्यात पुराव्यावर आधारित पारंपारिक पद्धती अंतर्भूत करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा बागची यांनी उल्लेख केला .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, आयुर्वेद, योग, युनानी आणि सिद्ध यासारख्या वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित पारंपारिक प्रणालींसह आधुनिक चिकित्सा प्रणालींचे एकत्रीकरण करून वैशिष्ट्यीकृत असलेला भारताचा दृष्टिकोन इतर राष्ट्रांसाठी एक व्यावहारिक मॉडेल म्हणून अधोरेखित करण्यात आला आहे. भारताने मागील जागतिक आरोग्य संघटनेचे पारंपरिक औषध धोरण (2014-2023) अंमलात आणताना सक्षम नेतृत्व दाखवून दिले आहे आणि सोबतच पुढील आराखड्याला पाठिंबा दर्शविला आहे, असे बागची यांनी सांगितले.
या वर्षीची एक महत्त्वाची घडामोड म्हणजे 24 मे 2025 रोजी आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यात आंतरराष्ट्रीय आरोग्य उपाय वर्गीकरण (ICHI) अंतर्गत समर्पित पारंपरिक औषध आराखड्यावर काम सुरू करण्यासाठी देणगीदार करारावर स्वाक्षरी झाली. मन की बात भाषणात या महत्वपूर्ण टप्प्याची प्रशंसा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की यामुळे आयुष प्रणाली वैज्ञानिक आणि प्रमाणित आराखड्याद्वारे जगात सर्वांपर्यंत पोहोचू शकेल.
जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, जागतिक आरोग्य संघटनेचे नवीन धोरण सदस्य राष्ट्रांना नियमन वाढविण्यासाठी, योग्य ठिकाणी पारंपरिक चिकित्स सेवा एकत्रित करण्यास तसेच स्वदेशी ज्ञान, पर्यावरणीय शाश्वतता आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यास प्रोत्साहित करते. भारताचे उपक्रम या तत्त्वांशी चपखल जुळणारे असून ते जागतिक कल्याणासाठी पारंपरिक औषधांना चालना देण्यात एक वचनबद्ध भागीदार म्हणून भारताची भूमिका अधोरेखित करतात.
S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2131684)
आगंतुक पटल : 15