दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सायबर फसवणूक प्रतिबंध बळकट करण्यासाठी दूरसंचार विभागाकडून "आर्थिक फसवणूक जोखीम सूचनादर्शक (एफआरआय)" जारी


बँका, यूपीआय सेवा प्रदाते आणि वित्तीय संस्थांसोबत वर्धित गुप्तचर सामायिकीकरण एफआरआय द्वारे सक्षम

अशा क्रमांकावर डिजिटल पेमेंट करण्याचा प्रस्ताव आल्यास या साधनाने दर्शवलेल्या मोबाईल क्रमांकाच्या बाबतीत सायबर संरक्षण आणि प्रमाणीकरण तपासणीला मिळते चालना

एफआरआयमुळे दूरसंचार आणि वित्तीय दोन्ही क्षेत्रात संशयित फसवणुकींविरुद्ध जलद, लक्ष्यित आणि सहयोगी कारवाई करण्यास वाव

यूपीआय ही भारतभरात सर्वात पसंतीची पैसे अदा करण्याची पद्धत असल्याने, हा हस्तक्षेप लाखो नागरिकांना सायबर फसवणुकीला बळी पडण्यापासून वाचवेल

Posted On: 21 MAY 2025 4:38PM by PIB Mumbai

 

सायबर फसवणूक आणि आर्थिक गुन्ह्यांचा सामना करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, दूरसंचार विभागाने (डिओटी) "फायनान्शियल फ्रॉड रिस्क इंडिकेटर (एफआरआय)" अर्थात आर्थिक फसवणूक जोखीम सूचनादर्शक हितधारकांसोबत सामायिक करण्याची घोषणा केली आहे -हा सूचनादर्शक डिजिटल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म (डीआयपी) चा भाग म्हणून विकसित केलेल्या बहुआयामी विश्लेषणात्मक साधनाचा निष्कर्ष आहे जो सायबर फसवणूक प्रतिबंधासाठी आगाऊ कृतीयोग्य गोपनीयतेसह वित्तीय संस्थांना सक्षम बनवतो. जेव्हा अशा क्रमांकांवर डिजिटल पेमेंट करण्याचा प्रस्ताव असतो तेव्हा या साधनाने दर्शवलेल्या मोबाईल क्रमांकाच्या बाबतीत सायबर संरक्षण आणि प्रमाणीकरण तपासणी याद्वारे वाढेल.

"आर्थिक फसवणूक जोखीम सूचनादर्शक" म्हणजे काय?

हे एक जोखीम-आधारित मापन आहे जे मोबाईल क्रमांकाला आर्थिक फसवणुकीच्या मध्यम, उच्च किंवा खूप उच्च जोखमीशी संबंधित असल्याचे वर्गीकृत करते. हे वर्गीकरण भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C's) राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टल (एनसीआरपी), दूरसंचार विभागाचा चक्षु प्लॅटफॉर्म आणि बँका आणि वित्तीय संस्थांनी सामायिक केलेल्या गुप्तचर माहितीसह विविध हितधारकांकडून मिळवलेल्या माहितीचा निष्कर्ष आहे. तो हितधारकांना - विशेषतः बँका, एनबीएफसी आणि यूपीआय सेवा प्रदात्यांना - मोबाइल क्रमांकाला उच्च धोका असल्यास अंमलबजावणीला प्राधान्य देण्यास आणि अतिरिक्त ग्राहक संरक्षण उपाययोजना करण्यास सक्षम करतो.

अशा आगाऊ सूचना कशा सहाय्यकारक ठरतात ?

दूरसंचार विभागाचा डिजिटल गुप्तचर माहिती विभाग (डीआययु) नियमितपणे सेवा खंडित केलेल्या मोबाइल क्रमांकाची यादी (मोबाइल नंबर रिव्होकेशन लिस्ट - एमएनआरएल) हितधारकांसोबत सामायिक करतो आणि सेवा खंडित करण्याची कारणे जसे की सायबर-गुन्ह्यात सामील असल्याचे आढळणे, पुनर्पडताळणी अयशस्वी होणे, निर्धारित मर्यादा ओलांडणे. हे क्रमांक सहसा आर्थिक फसवणुकीसाठी देखील वापरले जातात.

सायबर फसवणुकीत गैरवापर होणाऱ्या मोबाईल क्रमांकाचे आयुष्य साधारणपणे काही दिवस असते आणि पूर्ण पडताळणीला अनेक दिवस लागू शकतात, त्यामुळे अशा क्रमांकाशी संबंधित जोखमीबाबतचा आगाऊ सूचनादर्शक खूप उपयुक्त ठरू शकतो. अशाप्रकारे, एखाद्या भागधारकाने संशयित मोबाईल क्रमांक ध्वजांकित करताच त्याचे बहुआयामी विश्लेषण करून त्याचे मध्यम, उच्च किंवा अति उच्च आर्थिक जोखीम असे वर्गीकरण केले जाते. त्यानंतर क्रमांकाबद्दलचे हे मूल्यांकन डीआयपीद्वारे सर्व भागधारकांसोबत त्वरित सामायिक केले जाते.

एफ आर आय च्या प्रारंभिक अवलंबकांपैकी एक म्हणून Phone Peने याचा वापर खूप उच्च एफ आर आय मोबाइल नंबरशी जोडलेल्या व्यवहारांना नकार देण्यासाठी तसेच PhonePe Protect वैशिष्ट्याचा भाग म्हणून ऑन-स्क्रीन अलर्ट प्रदर्शित करण्यासाठी केला आहे. PhonePe द्वारे सामायिक केलेला तपशील प्रारूपाची प्रभाविता दर्शवितो कारण सायबर फसवणूक प्रकरणांमध्ये प्रत्यक्षात सहभागी होण्यासाठी सॉफ्ट सिग्नल म्हणून पास केलेल्या क्रमांकाची निर्धारणक्षमता खूप जास्त असल्याचे आढळून आले आहे. मध्यम एफ आर आय क्रमांकासाठी, PhonePe व्यवहारास परवानगी देण्यापूर्वी सक्रिय वापरकर्ता इशारा प्रदर्शित करण्यासाठी काम करत आहे.

आर्थिक फसवणूक कमी होण्यासाठी इतर उद्योगांचे सहकार्य

अग्रणी यूपीआय प्लॅटफॉर्म - फोनपे, पेटीएम आणि गुगल पे, जे एकत्रितपणे 90% पेक्षा जास्त यूपीआय व्यवहार करतात, त्यांनी त्यांच्या प्रणालीमध्ये डीआयपी अलर्ट एकत्रित करण्यास सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ:

अग्रणी यूपीआय प्लॅटफॉर्मपैकी एकाने व्यवहार विलंब सुरू केला आहे, ज्यामध्ये अलर्ट आणि वापरकर्त्याच्या पुष्टीकरणाची आवश्यकता आहे.

इतर बँका देखील सायबर फसवणूक कमी करण्यासाठी डेटाचा सक्रियपणे वापर करत आहेत.

यूपीआय ही संपूर्ण भारतात सर्वात पसंतीची पेमेंट पद्धत असल्याने याच्या हस्तक्षेपामुळे लाखो नागरिक सायबर फसवणुकीला बळी पडण्यापासून वाचू शकतील. टेलिकॉम आणि वित्तीय दोन्ही क्षेत्रातील संभाव्य फसवणुकीविरुद्ध जलद, लक्ष्यित आणि सहयोगी कारवाई करण्यास एफ आर आय परवानगी देते.

दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी दूरसंचार विभाग राष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञानावर आधारित उपाय लागू करण्यासाठी तसेच भागधारकांशी सहयोग करण्यासाठी वचनबद्ध आहे, ज्यामुळे सर्व नागरिकांसाठी एक सुरक्षित आणि संरक्षित दूरसंचार परिसंस्था सुनिश्चित होईल. दूरसंचार विभाग वित्तीय संस्था आणि डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मशी संपर्क साधून असल्याने सतर्कता यंत्रणा अधिक अनुकूलित होतील आणि प्रतिसाद वेळ कमी होईल. ग्राहक संवादी प्रणालींबरोबर एफ आर आय चे एकत्रीकरण हे एक उद्योग मानक बनण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे भारताच्या डिजिटल वित्तीय परिसंस्थेत प्रणालीगत लवचिकता येईल.

***

S.Patil/V.Joshi/N.Mathure/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2130397)