उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती 20 ते 22 मे 2025दरम्यान गोवा दौऱ्यावर


उपराष्ट्रपती मुर्मूगांव बंदराला भेट देणार; नवीन प्रकल्पांचे करणार राष्ट्रार्पण

उपराष्ट्रपती भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या केंद्रिय किनारपट्टी कृषी संशोधन संस्थेमधील शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांशी साधणार संवाद

Posted On: 19 MAY 2025 6:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 मे 2025


उपराष्ट्रपती जगदीप धनखड 20 ते 22 मे 2025 या तीन दिवसांसाठी गोवा दौऱ्यावर असतील.

या दौऱ्यात 21 मे रोजी उपराष्ट्रपती मुर्मूगांव बंदराला भेट देणार असून तिथे ते बंदराशी संबंधित नवीन प्रकल्पांचे राष्ट्रार्पण करतील आणि मुर्मूगांव बंदर प्राधिकरणाचे वरीष्ठ अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील. मुर्मूगांव बंदरात असलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजावरील वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबतही धनखड संवाद साधतील.

22 मे रोजी उपराष्ट्रपती भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयसीएआर) – केंद्रिय किनारपट्टी कृषी संशोधन संस्थेला (सीसीएआरआय) भेट देणार असून तिथे ते प्राध्यापक व शास्त्रज्ञांसोबत चर्चा करतील.  

आपल्या गौवा दौऱ्यात उपराष्ट्रपती राज भवनालाही भेट देणार आहेत. राज भवन परिसरात  ते  चरक आणि सुश्रुत यांच्या पुतळ्यांचे अनावरण करतील. चरकांच्या आयुर्वेदातील आणि सुश्रुतांच्या शस्त्रक्रिया विद्येतील योगदानाच्या सन्मानार्थ हे पुतळे उभारण्यात आले आहेत.    

N.Chitale/S.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2129704)