संरक्षण मंत्रालय
भागीदारी पद्धतीने कार्य करणाऱ्या नवीन सैनिक शाळांच्या नोंदणीच्या चौथ्या फेरीसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू
Posted On:
15 MAY 2025 8:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मे 0225
संरक्षण मंत्रालयाने पात्र आणि इच्छुक अर्जदार सैनिक शाळांच्या नोंदणीसाठी एक ऑनलाइन वेब पोर्टल (https://sainikschoolsociety.in) उघडले आहे. सैनिक स्कूल सोसायटी अंतर्गत राज्य सरकार/सेवाभावी संस्था/खाजगी क्षेत्राच्या भागीदारीत 100 नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याच्या सरकारच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. इच्छुक शाळा/ट्रस्ट/सेवाभावी संस्था इत्यादी नोंदणीसाठी वेब पोर्टलला भेट देऊ शकतात आणि या संधीचा लाभ घेऊ शकतात.
100 नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याचे भारत सरकारचे ध्येय केवळ राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे आणि त्यांना सशस्त्र दलात सामील होण्यासारख्या चांगल्या करिअरच्या संधी देणे एवढेच नाही तर राष्ट्र उभारणीच्या कामात राज्य सरकार/सेवाभावी संस्था/खाजगी क्षेत्राला केंद्र सरकारसोबत हातात हात घालून काम करण्याची संधी प्रदान करणे हे आहे. यासाठी, संरक्षण मंत्रालयाने 86 खाजगी/सेवाभावी संस्था/राज्य सरकारी शाळांना नवीन सैनिक शाळा म्हणून मान्यता दिली आहे.
या नवीन सैनिक शाळा, संबंधित शिक्षण मंडळांशी संलग्नतेव्यतिरिक्त,सैनिक स्कूल सोसायटीच्या अंतर्गत काम करतील आणि भागीदारी पद्धतीच्या नवीन सैनिक शाळांसाठी या सोसायटीने विहित केलेल्या नियमांचे पालन करतील. याव्यतिरिक्त,त्यांच्या नियमित संलग्न बोर्ड अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, ते सैनिक स्कूल धर्तीवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक-आणि अभ्यासक्रम शिक्षण देखील देतील.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2128950)