सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने राष्ट्रीय पुरस्कार 2024 साठी एमएसएमई कडून मागवले अर्ज

Posted On: 15 MAY 2025 6:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 मे 0225

सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांच्या उत्कृष्ट कामगिरीची आणि त्यांच्या योगदानाची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन त्यांना प्रेरित आणि प्रोत्साहित करते. सध्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विविध श्रेणींमध्ये 35 राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. महिला उद्योजक, अनुसूचित जाती/जमातीतील उद्योजक तसेच ईशान्येकडील राज्यांमधील एमएसएमई उद्योजकांना विशेष तरतूदीद्वारे पुरस्कार दिले जातात. या योजनेअंतर्गत, पुरस्कारप्राप्त एमएसएमईंना 3 लाख रुपये (प्रथम पुरस्कार), 2 लाख रुपये (द्वितीय पुरस्कार) आणि 1 लाख रुपये (तृतीय पुरस्कार) बक्षीस स्वरूपात दिले जातात. त्याचबरोबर  चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाते.

राष्ट्रीय पुरस्कारांच्या 2024 च्या विविध श्रेणीसाठी एमएसएमईकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. दिनांक 14.04.2025 ते 20.05.2025 या कालावधीत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://dashboard.msme.gov.in/na/Ent_NA_Admin/Ent_index.aspx) द्वारे हे अर्ज सादर केले जाऊ शकतात. इच्छुक सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, गृह मंत्रालयाच्या  राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in/) द्वारे देखील त्यांचे अर्ज सादर करू शकतात. याबाबतचा तपशील www.dcmsme.gov.in वर उपलब्ध आहे. इच्छुक अर्जकर्ते अधिक माहितीसाठी जवळच्या एमएसएमई - विकास आणि सुविधा कार्यालय (MSME - DFO) किंवा दूरध्वनी क्रमांक 011-23063342 वर संपर्क साधू शकतात.

 

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2128886)