केंद्रीय लोकसेवा आयोग
डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली
Posted On:
15 MAY 2025 3:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मे 0225
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे माजी सचिव डॉ.अजय कुमार यांनी आज केंद्रीय लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे सर्वात ज्येष्ठ सदस्य लेफ्टनंट जनरल राज शुक्ला (निवृत्त) यांनी त्यांना ही शपथ दिली.
भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर येथून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी या विषयात बी.टेक. ही पदवी मिळवल्यानंतर डॉ.अजय कुमार यांनी अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठातून अप्लाईड इकॉनॉमिक्स या विषयात एम.एस. केले. तसेच त्यांनी मिनेसोटा विद्यापीठातील कार्लसन स्कूल ऑफ मॅनेजमेंट या संस्थेतून व्यवसाय व्यवस्थापन या विषयात डॉक्टरेट मिळवली.

डॉ.अजय कुमार हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस)1985 च्या तुकडीतील केरळ कॅडरचे विद्यार्थी आहेत. सुमारे 35 वर्षांच्या वैभवशाली कारकिर्दीत त्यांनी केरळ राज्य सरकार तसेच केंद्र सरकारमध्ये देखील बऱ्याच महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी राज्य स्तरीय पातळीवर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे व्यवस्थापकीय संचालक, माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य सचिव यांसारख्या पदांची महत्वपूर्ण जबाबदारी निभावली आहे. केंद्र सरकारमध्ये डॉ.अजय कुमार यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग संचालक, दूरसंवाद तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे संयुक्त सचिव, राष्ट्रीय माहितीविज्ञान केंद्राचे महासंचालक, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव अशा महत्त्वाच्या पदांचे काम सांभाळले. सर्वात अलीकडच्या काळात ते संरक्षण मंत्रालय सचिव म्हणून कार्यरत होते.
"जीवन प्रमाण"(निवृत्तीवेतन धारकांसाठी डिजिटल जीविताचे प्रमाणपत्र); मायगव्ह प्रगती (दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधानांची परिषद); बायो-मेट्रिक उपस्थिती प्रणाली; एम्स संस्थांमध्ये बाह्यरुग्ण विभागातील नोंदणी यंत्रणा; क्लाऊड सर्व्हिस पुरवठादारांच्या मदतीने सरकारसाठी “क्लाऊड फर्स्ट” नीती यांसारखे विविध ई-सरकारी उपक्रम राबवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये डॉ.अजय कुमार यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत.

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2128849)