पंतप्रधान कार्यालय
छत्तीसगढमधील रायपूर येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मदतीची घोषणा
प्रविष्टि तिथि:
12 MAY 2025 5:46PM by PIB Mumbai
छत्तीसगढमधील रायपूर येथे झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील जखमींच्याप्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे.
पंतप्रधानांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ) मधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या ‘एक्स’ वरील संदेशात म्हटले आहे,
छत्तीसगढच्या रायपूरमध्ये रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे मी अत्यंत दुःखी आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांना माझ्या शोकसंवेदना. जखमींना लवकर बरे वाटावे, ही प्रार्थना.
पीएमएनआरएफमधून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi”
***
S.Bedekar/R.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2128272)
आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam