अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय, ‘भारताचे हवामान वित्त वर्गीकरण’ या मसुद्याबाबत तज्ञ व नागरिकांकडून 25 जून 2025 पर्यंत सूचना मागवत आहे


भारताचे हवामान वित्त वर्गीकरण (Climate Finance Taxonomy) पर्यावरणपूरक तंत्रज्ञान व कृतींसाठी संसाधनांचे अधिकाधिक वहन सुनिश्चित करेल, जेणेकरून भारत 2070 पर्यंत नेट झिरोचे ध्येय गाठू शकेल, तसेच दीर्घकालीन, विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवता येईल

Posted On: 07 MAY 2025 8:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मे 2025

 

केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 (परिच्छेद 104) मध्ये घोषित केल्यानुसार, भारतासाठी हवामान वित्त वर्गीकरण विकसित करण्यासाठी आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय यांनी या वर्गीकरणाच्या मसुद्यावर सार्वजनिक आणि तज्ञांकडून सूचना मागविल्या आहेत (सूचनांसाठी आवश्यक प्रारूप खाली दिले आहे).

(CLICK HERE TO ACCESS — DRAFT FRAMEWORK OF INDIA’S CLIMATE FINANCE TAXONOMY)

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले होते:

“हवामान बदलाच्या अनुकूलतेसाठी व त्याच्या परिणामांचे शमन करण्यासाठी भांडवली प्रवेश सुलभ करण्याच्या दृष्टीने हवामान वित्त वर्गीकरण विकसित केले जाईल. हे आपले हवामान संकल्प पूर्ण करण्यास व हरित संक्रमणास पाठिंबा देण्यास मदत करेल.”

या घोषणेनंतर तयार करण्यात आलेल्या मसुदा आराखड्यात हवामान वित्त वर्गीकरणासाठी दृष्टीकोन, उद्दिष्टे व मूलभूत तत्त्वे मांडण्यात आली आहेत. यामध्ये हवामान संकल्पना व ‘विकसित भारत 2047’ या उद्दिष्टाशी सुसंगत असलेल्या कृती, प्रकल्प व उपक्रमांची वर्गवारी करण्यासाठीची कार्यपद्धतीही नमूद करण्यात आली आहे.

हा मसुदा विविध क्षेत्रीय परिशिष्टे तयार करण्याचा पाया ठरेल. या परिशिष्टांमध्ये हवामानपूरक उपक्रम, प्रकल्प व संक्रमणास चालना देणाऱ्या कृतींची स्पष्ट माहिती दिली जाईल.

भारताचे हवामान वित्त वर्गीकरण देशाला नेट झिरोच्या दिशेने वाटचाल करताना पर्यावरणपूरक तंत्रज्ञान व कृतींना आर्थिक पाठबळ मिळवून देईल. हे वर्गीकरण देशाच्या हवामान कृतींच्या उद्दिष्टांशी सुसंगत कृती ओळखण्याचे प्रभावी साधन ठरेल.

सूचना पाठवण्याची अंतिम तारीख: 25 जून 2025

ईमेल: aditi.pathak[at]gov[dot]in

Subject: Comments on the Draft Framework for the Taxonomy

सार्वजनिक सल्लामसलतीद्वारे प्राप्त झालेल्या सूचना योग्यरित्या विचारात घेतल्या जातील व त्यांचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय, भारताचे हवामान वित्त वर्गीकरणाचा अंतिम आराखडा प्रसिद्ध करेल.

सूचना देण्यासाठी प्रारूप (Format):

Name of organisation/person:

 

Contact details:

 

Category/Description of person giving comments:

S. No.

Para / Sub Para no

Comments

Rationale

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Patil/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2127605) Visitor Counter : 11