विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
महा- इव्ही मिशन अंतर्गत सहाय्यक म्हणून सात उच्च प्रभावी प्रकल्पांची (e-Nodes) निवड; मुंबई आयआयटीचाही समावेश
Posted On:
05 MAY 2025 2:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मे 2025
अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान (एएनआरएफ) ने “विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी उच्च प्रभावशाली क्षेत्रांचे आधुनिकिकरण मिशन” अर्थात महा इव्ही मिशन (MAHA-EV) साठी सहाय्यक म्हणून सात इ-नोड्स ची निवड केली आहे. यामध्ये मुंबई आयआयटीचाही समावेश आहे. भारतामध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या परिसंस्थेसमोरील महत्वाची आव्हाने पेलण्यासाठी आणि नवोन्मेषला चालना देण्यासाठी सध्याचा उपक्रम ‘एनएनआरएफ’ च्या छत्राखाली सुरू आहे.
एनएनआरएफ महा- इव्ही “कॉल फॉर प्रपोजल” तीन धोरणात्मक परिभाषित केलेल्या टेक्नॉलॉजिकल व्हर्टिकल्स (TV) वर केंद्रित आहे ज्यामध्ये ट्रॉपिकल EV बॅटरी आणि बॅटरी सेल्स (TV-I), पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मशीन्स आणि ड्राइव्ह्स (PEMD)- (TV-II) आणि EV चार्जिंग सुविधा (TV-III) यांचा समावेश आहे.
देशातील इव्ही क्षेत्रात संशोधन आणि विकासात योगदान देण्यासाठी आणि इव्ही क्षेत्र सुस्थापित करण्यासाठी, निवडलेले प्रत्येक इलेक्ट्रिक मोबिलिटी नोड्स (इ-नोड्स) शैक्षणिक संस्था/संशोधन आणि विकास प्रयोगशाळांचा समावेश तसेच उद्योगक्षेत्राच्या अनिवार्य सहभागाचा वापर करून एकत्रित पद्धतीने प्रकल्प राबवतील.
एनएनआरएफ महा- इव्ही मिशन अंतर्गत निवडलेले सात इ-नोड्स आहेत: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे, इंटरनॅशनल अॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल्स, हैदराबाद, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) सुरतकल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-BHU, CSIR- सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, पिलानी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर.
या आवाहनाच्या प्रतिसादस्वरूप सर्व भागधारकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. शैक्षणिक संस्था, संशोधन आणि विकास प्रयोगशाळा आणि औद्योगिक विभागाकडून एकत्रितपणे 227 प्रस्ताव प्राप्त झाले.
निवडलेल्या सात ई-नोड्सपैकी, दोन नोड्स ट्रॉपिकल इव्ही बॅटरी आणि सेल तंत्रज्ञानावर (TV-I ) लक्ष केंद्रित करतील, तीन नोड्स पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मशीन आणि ड्राइव्हवर (TV-II) काम करतील आणि उर्वरित दोन इ-नोड्स TV-III अंतर्गत चार्जिंग सुविधांवर लक्ष केंद्रित करतील.
महा इव्ही मिशनमुळे शाश्वतता, नवोन्मेष आणि स्वावलंबनाच्या उद्दिष्टांशी सुसंगत असलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहतूक सुविधांमध्ये भारताचे नेतृत्व प्रस्थापित होईल.
परिशिष्ट-१ मध्ये दिलेल्या संस्थांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
S.Bedekar/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2127004)
Visitor Counter : 20