भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय निवडणूक आयोग हितधारकांसाठी लवकरच एक ‘सिंगल-पॉइंट अॅप’ सुरु करणार; वर्धित यूआय/यूएक्स सह विद्यमान 40 हून अधिक आयटी अॅप्स अंतर्भूत करणार


नवीन ‘ईसीआयनेट’ मुळे नागरिकांसाठी मतदान विषयक सेवा सुलभ होणार; निवडणूक अधिकाऱ्यांसाठी वेगवान आणि सुलभ डेटा हाताळणी

Posted On: 04 MAY 2025 1:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 मे 2025

 

एका प्रमुख  उपक्रमात, भारतीय निवडणूक आयोग (ईसीआय) मतदारांसाठी आणि त्याच्या इतर हितधारकांसाठी उदा.  निवडणूक अधिकारी, राजकीय पक्ष आणि नागरी समाजासाठी एक नवीन वापरकर्ता-अनुकूल ‘डिजिटल इंटरफेस’ विकसित करत आहे. इसीआयनेट हा नवीन वन-स्टॉप प्लॅटफॉर्म, निवडणूक आयोगाच्या विद्यमान 40 हून अधिक मोबाइल आणि वेब अनुप्रयोगांना एकत्रित आणि पुनर्निर्देशित करेल.

ईसीआयनेट  मध्ये एक अभिरुचीपूर्ण  वापरकर्ता इंटरफेस (यूआय) आणि एक सुलभ वापरकर्ता अनुभव (यूएक्स) असेल जो सर्व निवडणूक-संबंधित कामांसाठी एक  व्यासपीठ प्रदान करेल.  वापरकर्त्यांना विविध अॅप्स डाउनलोड आणि नेव्हिगेट करण्यासाठी आणि वेगवेगळे ‘लॉगिन’  लक्षात ठेवताना येणाऱ्या अडचणी कमी करण्याच्या दृष्टीने याची रचना केली आहे.

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त  ज्ञानेश कुमार यांनी मार्च  2025 मध्ये निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या उपस्थितीत झालेल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिषदेदरम्यान अशा मंचाची  कल्पना मांडली होती.

ईसीआयनेट  वापरकर्त्यांना त्यांच्या डेस्कटॉप किंवा स्मार्टफोनवर संबंधित निवडणूक माहिती शोधण्यास  सक्षम बनवेल. डेटा शक्य तितका अचूक असावा याची खातरजमा करण्यासाठी, ईसीआयनेट वरील डेटा केवळ अधिकृत निवडणूक आयोग  अधिकाऱ्याद्वारे प्रविष्ट केला जाईल.

ईसीआयनेट  विकासाच्या प्रगत टप्प्यावर असून  सुरळीत कार्यक्षमता, वापर सुलभता आणि मजबूत सायबर सुरक्षा उपाय सुनिश्चित करण्यासाठी कठोर चाचण्या घेतल्या जात आहेत. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे 36 सीईओ, 767 डीईओ  आणि त्यांच्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे 4,123 ईआरओ  यांच्याशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर  आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या निवडणूक रूपरेषा , सूचना आणि हँडबुकच्या 9,000 पृष्ठांचा समावेश असलेल्या 76 प्रकाशनांचा आढावा घेतल्यानंतर ते विकसित केले जात आहे.

भारतीय निवडणूक आयोगाच्या  विद्यमान 40 अॅप्सची सूची

Sl. No.

Application

Type

  1.  

Affidavit Portal

Web

  1.  

India A Web

Web

  1.  

Results Website

Web

  1.  

Election24 (Archive)

Web

  1.  

ECI SVEEP

Web

  1.  

ECI Website

Web

  1.  

Fembosa

Web

  1.  

Voicenet

Web

  1.  

Myth Vs Reality

Web

  1.  

Election Trends TV

Web

  1.  

cVigil Portal

Web

  1.  

EMS

Web

  1.  

RTI Portal

Web

  1.  

ENCORE

Web

  1.  

Media Voucher

Web

  1.  

Suvidha Portal

Web

  1.  

Observer Portal

Web

  1.  

Election Planning

Web

  1.  

IEMS

Web

  1.  

PPRTMS

Web

Sl. No.

Application

Type

  1.  

ERONET2.0

Web

  1.  

Voters Service Portal

Web

  1.  

Service Voters Portal

Web

  1.  

ETPBMS

Web

  1.  

NGSP

Web

  1.  

Electoral Search

Web

  1.  

ERONET App

Mobile

  1.  

BLO App

Mobile

  1.  

cVigil App

Mobile

  1.  

Decider App

Mobile

  1.  

ENCORE Nodal App

Mobile App

  1.  

ESMS App

Mobile

  1.  

Investigator App

Mobile

  1.  

KYC App

Mobile

  1.  

Monitor App

Mobile

  1.  

Observer App

Mobile

  1.  

Saksham App

Mobile

  1.  

Suvidha App

Mobile

  1.  

Voter Helpline App

Mobile

  1.  

Voter Turnout App

Mobile

                                                       

 

* * *

S.Bedekar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2126704) Visitor Counter : 18
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil