माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज 2025 मध्ये 60 हून अधिक देशांच्या प्रतिनिधींसह यूके, जपान आणि रशिया जागतिक माध्यम संवादात होणार सहभागी
जागतिक माध्यम संवादाचा भाग म्हणून वेव्हज घोषणापत्र होणार जाहीर
वेव्हज 2025 चा केंद्रबिंदू असलेल्या जागतिक माध्यम संवादामध्ये मंत्रिस्तरीय प्रतिनिधींचा सहभाग
Posted On:
01 MAY 2025 8:20PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 1 मे 2025
मुंबईमध्ये सुरू असलेल्या वेव्हजचा भाग म्हणून प्रथमच ग्लोबल मीडिया डायलॉग (जीएमडी) म्हणजेच जागतिक माध्यम संवादाचे यजमानपद भूषविण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. जागतिक प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील देशाच्या सहभागाचा हाँ एक महत्त्वाचा टप्पा आहे. या संवाद कार्यक्रमाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे केले आहे. या संवाद कार्यक्रमाला भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सहकार्य आहे.
या कार्यक्रमात आशिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिकेतील शिष्टमंडळांसह 60 हून अधिक देश सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. रशिया, जपान, यूके, इजिप्त, सौदी अरेबिया आणि इतर अनेक देशांचे मंत्रिस्तरीय तसेच वरिष्ठ अधिकारी पातळीवर प्रतिनिधी सहभागी होतील. या संवादाचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणे, सर्वोत्तम पद्धतींना चालना देणे आणि जागतिक माध्यम क्षेत्रात धोरणात्मक संरेखन, प्रतिभेची देवाणघेवाण तसेच क्षमता बांधणीसाठी मार्ग शोधणे आहे.
या संवादाची फलनिष्पत्ती म्हणजे सहभागी देशांकडून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करून भविष्यातील सहभाग आणि भागीदारीच्या दृष्टीने पायाभरणी करणारे 'वेव्हज घोषणापत्र' जाहीर करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. भारत आपल्या गतिमान माध्यम परिसंस्था आणि वेगाने वाढणाऱ्या मनोरंजन उद्योगासह अशा संवादाचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. जगाला आकार देण्यातील माध्यमांच्या भूमिकेवरील जागतिक संभाषणांच्या केंद्रस्थानी भारताला स्थान मिळावे, यादृष्टीने जागतिक माध्यम संवाद हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे.
जागतिक माध्यम संवाद जगभरातील प्रमुख संबंधित घटकांना एकत्र आणणार आहे, त्यामुळे समाज, अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला आकार देण्यात माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राची विकसनशील भूमिका यावर चर्चा होईल. हा संवाद माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या बदलत्या परिदृश्यावर मोकळ्या संभाषणांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देईल. वेगवान तंत्रज्ञानात्मक बदल, आशय सामग्रीच्या बदलत्या प्रवृत्ती आणि वाढते जागतिक परस्परसंबंध या बरोबरच समाजाला आकार देण्यात माध्यमाची भूमिका, नाविन्याला चालना देणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी कल्पना, अनुभव आणि दृष्टिकोन यांचे आदान-प्रदान करणे, हे या संवादाचे उद्दिष्ट आहे.
वेव्हज (WAVES) बरोबरच, भारत या दरम्यान युनायटेड किंगडम, रशिया, इंडोनेशिया, केनिया, भूतान आणि इजिप्त यासह 10 हून अधिक देशांशी तसेच जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांशी द्विपक्षीय बैठका आयोजित करत आहे. या उपक्रमांतून भारताची जागतिक सहकार्य मजबूत करण्याची आणि परस्पर हिताच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये भागीदारी वाढवण्याची वचनबद्धता दिसून येते.
या कार्यक्रमाला भारतातील वरिष्ठ नेतृत्वाची उपस्थिती लाभणार आहे, यामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांचा समावेश आहे. उच्चपदस्थ मान्यवरांची असणारी उपस्थिती भारताची मजबूत, समावेशक आणि भविष्याभिमुख जागतिक माध्यम वातावरणाला चालना देण्याची वचनबद्धता अधोरेखित करेल.
* * *
PIB Mumbai |S.Bedekar/Nandini/Nikhilesh/D.Rane
Release ID:
(Release ID: 2125919)
| Visitor Counter:
29