WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

वेव्हज 2025 क्रिएटोस्फीअर -'क्रिएट इन इंडिया चॅलेंजेस' मधील कल्पकतेचा अविष्कार


'वेव्हज क्रिएटर पुरस्कार' भारतासह जगभरातील सर्जनशील प्रतिभा आणि क्षमतांचा गौरव करून त्याला प्रोत्साहन देणार

 Posted On: 30 APR 2025 9:37PM |   Location: PIB Mumbai

मुंबई, 30 एप्रिल 2025

 

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये उद्यापासून सुरू होत असलेल्या  वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट (वेव्हज), अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेत, या जागतिक महोत्सवातील, महत्वाकांक्षी उपक्रम म्हणून सुरू करण्यात आलेला क्रिएट इन इंडिया चॅलेंज (सीआयसी) सीझन 1, अंतिम फेरीच्या सादरीकरणासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे, सीआयसी सीझन 1 ने 1 लाख नोंदणीचा टप्पा पार केला असून, नोंदणीची एकूण संख्या आता 1,01,349 इतकी झाली आहे. या उपक्रमात 60 हून अधिक देशांच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून, जागतिक स्तरावरील लोकप्रियता आणि पोहोच अधोरेखित केली आहे. या असामान्य प्रतिभावंतांमधील अंतिम फेरीत निवड झालेल्या 750 स्पर्धकांना क्रिएटोस्फीअरमध्ये त्यांचे सर्जनशील कौशल्य आणि निर्मिती प्रदर्शित करण्याची संधी  मिळेल. क्रिएटोस्फीअर हे वेव्हज  2025 चा एक भाग म्हणून अॅनिमेशन, कॉमिक्स, एआय, एक्सआर, गेमिंग, संगीत आणि  अनेक नवोन्मेशी अविष्कारासाठी खास उभारण्यात  आलेले व्यासपीठ आहे.

क्रिएटोस्फीअर?

क्रिएटोस्फीअर हे नवोन्मेश आणि कल्पकतेचे एक अद्भुत विश्व आहे, जे कल्पनांना अनुभवांमध्ये रूपांतरित करण्यासाठीचे  स्थान म्हणून तयार करण्यात आले आहे. एक अशी जागा जिथे क्रिएटर्स  केंद्रस्थानी असतात, जे माध्यम  आणि मनोरंजन विश्वातील व्हर्च्युअल रिअॅलिटीपासून चित्रपटांपर्यंत, व्हीएफएक्सपासून कॉमिक्सपर्यंत, अॅनिमेशनपासून गेमिंगपर्यंत आणि संगीतापासून ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल मीडियापर्यंत कल्पनाशक्ती, प्रयोगशीलता आणि कलात्मक उत्कृष्टतेची भावना साजरी करतात.क्रिएट इन इंडिया चॅलेंज'च्या अंतिम फेरीतील स्पर्धक, म्हणजेच जगभरातील सर्वोत्कृष्ट सर्जनशील  प्रतिभावंत - त्यांच्यात संवादाला चालना देण्यासाठी, नवोन्मेश जगवण्यासाठी, भागीदारी करण्यासाठी एकत्र आले आहेत.  भारताची सर्जनशील ऊर्जा जागतिक प्रेक्षकांशी जोडताना ते त्यांचे काम प्रदर्शित करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड' हे उद्दिष्ट 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज'च्या केंद्रस्थानी असून, 'कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज' हे  ब्रीदवाक्य यासाठी  समर्पक आहे.  वेव्हजच्या  केंद्रस्थानी असलेला हा उपक्रम भारताच्या सर्जनशील महत्त्वाकांक्षेची सशक्त अभिव्यक्ती म्हणून उदयाला आला असून, जागतिक प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योगात, देशाचे वाढते नेतृत्व अधोरेखित करत आहे आणि  या क्षेत्राच्या भविष्याला आकार देत आहे. हे खऱ्या अर्थाने वसुधैव कुटुंबकम या प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचे सार आहे, जे जग हे एक कुटुंब आहे, असे मानते.

क्रिएट इन इंडिया चॅलेंज सीझन 1 ची व्याप्ती आणि प्रभाव अभूतपूर्व असून या उपक्रमाचे रूपांतर जागतिक सर्जनशील चळवळीत झाले आहे. 1,100 हून अधिक आंतरराष्ट्रीय प्रवेशिकांसह, ही आव्हाने त्यांच्या पहिल्याच पर्वात खऱ्या अर्थाने जागतिक बनली आहेत. उच्च दर्जाच्या परीक्षकांनी  त्यांचे महत्वपूर्ण विचार  आणि निवडीचे मजबूत निकष यांसह सर्व आव्हानांमधून सर्वोत्तम अंतिम स्पर्धकांची निवड केली आहे जे  क्रिएटोस्फीअरमध्ये त्यांची कल्पकता प्रदर्शित करतील. यात भारतातील सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश तसेच 20 हून अधिक देशांमधील सहभागींचा समावेश आहे. ही  कामगिरी क्रिएट इन इंडिया चॅलेंज आणि क्रिएटोस्फीअरचे वैविध्य , उत्कृष्टता आणि जागतिक ठसा अधोरेखित करते.

 

चार दिवस चालणाऱ्या या परिषदेदरम्यान, प्रतिनिधी, निर्माते आणि सहभागीना  सर्जनशीलता,ज्ञान आणि विविधतेतील एकतेचा एक चैतन्यदायी  संगम अनुभवायला मिळणार आहे. खास तयार केलेले मास्टरक्लासेस, पॅनेल चर्चा, कार्यशाळा, सादरीकरणे आणि प्रदर्शनांद्वारे, क्रिएटोस्फीअर व्यावसायिक वातावरणात अर्थपूर्ण संवाद आणि भविष्यवेधी  कल्पनांना चालना देईल. यानिमित्ताने एव्हीजीसी -एक्सआर, प्रसारण, चित्रपट, संगीत, डिजिटल आणि सोशल मीडिया सारख्या क्षेत्रांना एकत्र आणले आहे.  नऊ विशेष क्षेत्रे  व्हर्च्युअल लोक, व्हीएफएक्स व्हॉल्ट, फिल्म फिएस्टा, अॅनिमेशन अॅली, कॉमिक कोना, म्युझिक मॅनिया, एअरवेव्ह्ज , डिजिटल डोमेन आणि गेम ऑन - या आव्हानांचे अग्रगण्य परिणाम प्रदर्शित करतील.

उद्याच्या युवा क्रिएटर्सना  व्यासपीठ प्रदान करण्यासाठी, क्रिएटोस्फीअर मध्ये  भव्य 'क्रिएटर्स अवॉर्ड्स' समारंभदेखील आयोजित केला आहे. हा  एक रेड-कार्पेट कार्यक्रम  आहे जिथे  क्रिएट इन इंडिया चॅलेंजेसच्या विजेत्यांना प्रतिष्ठित 'वेव्हज क्रिएटर अवॉर्ड्स' देऊन सन्मानित केले जाईल.  या भव्य सोहळ्यात माध्यम आणि मनोरंजन  क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार, सेलिब्रिटी आणि उद्योग अग्रणींच्या  उपस्थितीत क्रिएटिव्ह चॅम्पियन्सना सर्वोच्च सन्मान प्रदान केले जातील. म्युझिकल चॅलेंजेसचे  विजेते त्यांच्या सर्वात मोहक रचनांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवतील. अशाप्रकारे क्रिएटोस्फीअर हे नवोन्मेषाचे केंद्र आणि सांस्कृतिक कार्निव्हल म्हणून कामगिरी बजावेल आणि भारताच्या सर्जनशील सामर्थ्याच्या कल्पकतेचा  उत्सव साजरा करेल. 

 

* * *

PIB Mumbai | S.Kakade/Sushma/Rajshree/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


Release ID: (Release ID: 2125631)   |   Visitor Counter: 12