वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारतीय आणि अमेरिकी अधिकाऱ्यांची वॉशिंग्टन येथे बैठक, द्विपक्षीय व्यापार करारविषयक वाटाघाटींमध्ये सकारात्मक प्रगती
Posted On:
29 APR 2025 4:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2025
भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भात सध्या सुरु असलेल्या चर्चेचा भाग म्हणून 23 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीत वॉशिंग्टन डी.सी.येथे भारताच्या वाणिज्य विभागातील अधिकारी आणि अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधित्व कार्यालयाच्या प्रतिनिधींची बैठक झाली. याआधी मार्च 2025 मध्ये नवी दिल्ली येथे दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय चर्चा झाली होती, त्यापाठोपाठ ही बैठक झाली आहे.
वॉशिंग्टन डी.सी.मध्ये झालेल्या बैठकींच्या कामकाजादरम्यान आयात कर तसेच या व्यतिरिक्त इतर अनेक विषयांच्या विस्तृत श्रेणीवर या पथकाने फलदायी चर्चा केली. यावेळी प्रतिनिधींनी सुरुवातीच्या परस्पर लाभदायी संधींच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यासह 2025 च्या शरद ऋतूपर्यंत परस्पर हिताच्या, बहु क्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठीच्या मार्गांबाबत विचारविनिमय केला. क्षेत्रीय तज्ञ पातळीवरील उत्पादक सहभागाची आभासी पद्धतीने सुरुवात करण्यात आली असून येत्या मे महिन्याच्या अखेरीपासून तज्ञांच्या क्षेत्रनिहाय प्रत्यक्ष सहभागाचे नियोजन करण्यात आले आहे.
द्विपक्षीय व्यापार कराराच्या माध्यमातून भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक संबंध वाढवून विस्तारण्यासाठी तसेच पुरवठा साखळीचे एकत्रीकरण करण्यासाठी फेब्रुवारी 2025 मध्ये जारी करण्यात आलेल्या नेत्यांच्या निवेदनाला अनुसरुन होत असलेल्या उत्पादक चर्चा द्विपक्षीय प्रयत्नांचा भाग आहेत.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2125180)
Visitor Counter : 19