युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विकसित व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाचे 15 ते 30 मे 2025 दरम्यान होणार आयोजन; माय भारत व्यासपीठावर 23 एप्रिलपासून नावनोंदणी सुरू


सीमावर्ती गावांना नवीन ओळख देण्यासाठी आणि भारताच्या सीमावर्ती समुदायांमध्ये परिवर्तन आणण्यासाठी तरुणांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 25 APR 2025 2:16PM by PIB Mumbai

 

विकसित व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रम हा भारताच्या दुर्गम सीमावर्ती भागांना नवी झळाळी देण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेल्या एक संयुक्त उपक्रम आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली, गृह मंत्रालयाच्या समन्वयाने, स्थानिक प्रशासन संस्था आणि इंडो  - तिबेट सीमा पोलिस  दल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. 15 ते 30 मे 2025 दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमात लेह-लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

देशभरातील 500 माय भारत स्वयंसेवकांना या कार्यक्रमात सहभागी करून घेऊन त्यांना सक्षम बनवले जाईल, जेणेकरून हे तरुण 100 निवडक गावांमधील समुदायांबरोबर थेट काम करतील.  हे स्वयंसेवक शैक्षणिक सहाय्य आणि पायाभूत सुविधांच्या विकासापासून ते आरोग्यसेवा आणि सांस्कृतिक संवर्धन यासारख्या विविध उपक्रमांद्वारे तळागाळातील लोकांशी संवाद साधतील आणि समुदायाचा विकास साधतील. स्थानिक रहिवाशांना कार्यक्रमात सहभागी करून तसेच युवा नेतृत्वाच्या ताकदीचा फायदा घेऊन सीमावर्ती भागात दीर्घकालीन आणि सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे आहे हे कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे

विकसित व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमासाठी आवश्यक  असलेल्या नावनोंदणीची अधिकृत सुरुवात 23 एप्रिल 2025 रोजी माय भारत पोर्टलद्वारे सुरू झाली आहे. या परिवर्तनकारी संधीसाठी संपूर्ण भारतातील स्वयंसेवकांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत  आहे. प्रत्येक केंद्रशासित प्रदेशांमधून 10 तर  प्रत्येक सहभागी राज्यातून 15 स्वयंसेवक निवडले जाणार आहेत. एकूण 500 स्वयंसेवकांना या कार्यक्रमाचा कणा म्हणून काम करण्यासाठी निवडले जाणार असून हे स्वयंसेवक गावांमध्ये उपक्रमांचे नेतृत्व आणि समन्वय करतील.

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, शिकण्याचा  प्रवाससांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम आणि तळागाळातील विकास प्रकल्प सुरू केले जात आहेत. यामुळे तरुणांना भारताच्या सीमावर्ती प्रदेशांची  अद्वितीय सामाजिक-सांस्कृतिक आणि धोरणात्मक वीण जाणता येईल.

हा कार्यक्रम 7 दिवसांत सुरू होईल, प्रत्येक दिवस सामुदायिक विकासाच्या एका विशिष्ट क्षेत्रासाठी समर्पित असेल.  या उपक्रमांमध्ये हे समाविष्ट आहे :

1. सामुदायिक सहभाग

2. युवा नेतृत्व विकास

3. सांस्कृतिक प्रोत्साहन

4. आरोग्यसेवा जागरूकता आणि सहयोग

5. कौशल्य-निर्मिती आणि शिक्षण

6. पर्यावरण संरक्षण सर्वोत्तम पद्धती

7. करिअर समुपदेशन सत्रे

8. खेळ, योग, ध्यान इत्यादी शारीरिक तंदुरुस्तीसंबंधीत उपक्रम

9. माझ्या स्वप्नातील भारत या विषयावर खुले विचारमंथन, निबंध, फायरसाइड चॅट इ.

ज्ञानाचे हस्तांतरण आणि राष्ट्रीय जाणीव जागृती

तरुण नागरिकांना या कार्यक्रमाद्वारे सीमावर्ती समुदायांचा वारसा, जुळवून घेण्याचा स्वभाव आणि क्षमता जाणून घेण्याची आणि त्यांचे दस्तऐवजीकरण करण्याची संधी मिळेल.

सीमावर्ती गावांना एक नवीन ओळख देणे

सीमेवरची गावे "नकाशावर शेवटची" आहेत, ही दीर्घकाळापासून चालत आलेली रूढी मोडून काढण्याचा प्रयत्न हा कार्यक्रम करत आहे. त्याऐवजी, 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासात ते 'पहिली गावे' म्हणून त्यांच्याकडे आता पाहिले जाते.

या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय दिल्लीमध्ये एक अभिमुखता कार्यक्रम आयोजित करणार असून या कार्यक्रमात निवडलेल्या सर्व स्वयंसेवकांना सघन माहिती  आणि प्रशिक्षण सत्रे पूर्ण करावी लागतील.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2124366) Visitor Counter : 19