पंचायती राज मंत्रालय
राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त, विशेष श्रेणीतील राष्ट्रीय पंचायत पुरस्कार-2025 दिनांक 24 एप्रिल रोजी, बिहार येथे प्रदान केले जाणार आहेत
यावेळी प्रथमच, पंचायती राज मंत्रालयाने हवामानासंदर्भातील उपक्रम आणि स्वावलंबन या विषयावरील पंचायतींच्या प्रयत्नांची दखल घेण्यासाठी विशेष श्रेणीतील पुरस्कारांची घोषणा केली आहे
Posted On:
23 APR 2025 6:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 एप्रिल 2025
यंदाच्या वर्षीचा राष्ट्रीय पंचायती राज दिन कार्यक्रम (NPRD) दिनांक 24 एप्रिल, 2025 रोजी बिहार येथील मधुबनी जिल्ह्यातील लोहना उत्तर ग्रामपंचायत, येथे आयोजित करण्यात आला असून NPRD-2025 च्या या राष्ट्रीय कार्यक्रमात प्रथमच विशेष श्रेणीतील राष्ट्रीय पंचायत पुरस्कार-2025 घोषित करण्यात येणार आहेत. महसुलाचे (OSR) स्रोत वाढवत हवामान संदर्भात कृती आणि आत्मनिर्भरता या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांना विशेष महत्त्व देणाऱ्या ग्रामपंचायतींच्या विशेष अनुकरणीय प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची प्रशंसा करण्यासाठी समर्पित अशी पुरस्कारांची विशेष श्रेणी यंदा घोषित करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त स्थानिकीकरणाला प्राधान्य देत, क्षमता विकासासाठी शाश्वत विकास उद्दिष्टे (LSDGs) गाठणाऱ्या पंचायतींना देखील सर्वोत्कृष्ट श्रेणीतील पुरस्कार यावेळी प्रदान केले जातील.
पंचायती/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राष्ट्रीय प्राधान्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाची दखल घेण्यासाठी विशेष श्रेणीचे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सुरू केले आहेत,ते पुढीलप्रमाणे:
- क्लायमेट ऍक्शन स्पेशल पंचायत अवॉर्ड (CASPA) – हवामानाविषयी-प्रतिसाद देणाऱ्या स्थानिक संस्था म्हणून काम करण्यास प्रोत्साहित करणाऱ्या पंचायतींना;
- आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार (ANPSA) – स्वतःचा महसूल स्रोत(OSR) वाढवून आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देणाऱ्या पंचायतींना;;
- पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार (PKNSSP) – पंचायती राज प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या क्षमतांचा विकास करत उत्कृष्ट प्रशिक्षण देणाऱ्यांसाठी असलेला हा पुरस्कार मंत्रालयाने 2023 मध्ये घोषित केला केला आणि 2024 मध्ये पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार-2025 च्या विशेष श्रेणीसाठी पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे आहेत:
हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार (CASPA)
- प्रथम क्रमांक: डाव्वा एस ग्रामपंचायत,जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र
- द्वितीय क्रमांक: बिरदहल्ली ग्रामपंचायत,जिल्हा हसन, कर्नाटक
- तृतीय क्रमांक: मोतीपूर ग्रामपंचायत,जिल्हा समस्तीपूर , बिहार
आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार (ANPSA)
- प्रथम क्रमांक: मल ग्रामपंचायत,जिल्हा रंगारेड्डी, तेलंगणा
- द्वितीय क्रमांक: हातबदरा ग्रामपंचायत,जिल्हा मयूरभंज, ओडिशा
- तृतीय क्रमांक: गोल्लापुडी ग्रामपंचायत,जिल्हा कृष्णा, आंध्र प्रदेश
पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार (PKNSSP)
- प्रथम क्रमांक: केरळ इन्स्टिट्यूट ऑफ लोकल ॲडमिनिस्ट्रेशन (KILA), केरळ
- द्वितीय क्रमांक: राज्य ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था, ओडिशा
- तृतीय क्रमांक: राज्य पंचायत आणि ग्रामीण विकास संस्था, आसाम
प्रत्येक पुरस्कारात अनुक्रमे 1 कोटी रुपये (प्रथम क्रमांकासाठी), 75 लाख रुपये ( द्वितीय क्रमांकासाठी) आणि 50 लाख (तृतीय क्रमांकासाठी) रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन समाविष्ट आहे. पुरस्कार विजेत्यांना खास डिझाईन केलेले मानचिन्ह आणि प्रमाणपत्रे प्रदान केली जातील. उल्लेखनीय बाब म्हणजे, 6 पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींपैकी 3 {बिहार (मोतीपूर ग्रामपंचायत), महाराष्ट्र (डाव्वा एस ग्राम पंचायत), आणि ओडिशा (हटबद्रा ग्रामपंचायत)} - ग्राम पंचायतींचे नेतृत्व महिला सरपंच करत आहेत.
* * *
S.Patil/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2123908)
Visitor Counter : 41