ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय मानक ब्युरोकडून सामंजस्य करार भागीदार संस्थांमधील 500 विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपची घोषणा
इंटर्नशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योगांमध्ये मानकीकरणविषयक जागरूकता आणि व्यावहारिक सहभागाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश
Posted On:
22 APR 2025 2:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2025
भारत सरकारच्या अंतर्गत येणारी राष्ट्रीय मानक संस्था, भारतीय मानक ब्युरोने सामंजस्य करारात भागीदार असणाऱ्या संस्थांमधील 500 विद्यार्थ्यांसाठी मानकीकरणाच्या क्षेत्रात इंटर्नशिपच्या संधी जाहीर केल्या आहेत. भारतीय मानक ब्युरोच्या मानकीकरण अध्यक्ष आणि सामंजस्य करार भागीदार संस्थांच्या नोडल फॅकल्टीच्या अलीकडेच झालेल्या वार्षिक अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली. इंटर्नशिपसाठी 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम, 5 वर्षांचे एकात्मिक पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात येईल.
भारतीय मानक ब्युरोने शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने केलेल्या काही प्रमुख उपक्रमांची माहिती:
- 15 संस्थांच्या अभ्यासक्रमात मानकीकरण मॉड्यूल समाविष्ट करण्यात आले आहेत.
- 130 हून अधिक संशोधन आणि विकास प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत.
- 50 हून अधिक संस्थांनी बीआयएस कॉर्नर आणि शैक्षणिक डॅशबोर्ड स्थापित केले आहेत.
- 52 संस्थांमध्ये एकूण 198 मानक क्लब स्थापन करण्यात आले आहेत.
- राष्ट्रीय प्रश्नमंजूषांमध्ये 74 संस्थांमधील 3,400 हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
- 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी 500 विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिपचे नियोजन आहे.
या अधिवेशनाला 58 भागीदार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सामंजस्य करारानुसार भारतीय मानक ब्युरोशी संबंधित उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आयआयटी रुरकी, एसएसईसी चेन्नई, एनआयटी जालंधर, एसव्हीसीई चेन्नई आणि पीएसएनएसीईटी दिंडीगुल या पाच संस्थांना सन्मानित करण्यात आले.
* * *
S.Bedekar/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2123427)
Visitor Counter : 16