पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलोन मस्क यांच्याशी झालेल्या चर्चेत द्विपक्षीय तंत्रज्ञान सहकार्याची क्षमता केली अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
18 APR 2025 2:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एलोन मस्क यांच्याशी दूरध्वनीवरून परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर विधायक चर्चा केली. या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या त्यांच्या भेटीदरम्यान चर्चेत समाविष्ट असलेल्या विषयांवर आज पुन्हा चर्चा झाली. आजच्या चर्चेतून तंत्रज्ञान विषयक प्रगतीसाठी सामायिक दृष्टिकोन अधोरेखित झाला.
तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात भारत आणि अमेरिका दरम्यान सहकार्याची प्रचंड क्षमता पंतप्रधानांनी अधोरेखित केली. या क्षेत्रात भागीदारी वाढवण्यासाठी भारताच्या दृढ वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे :
“@elonmusk यांच्याशी बोललो. या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या आमच्या भेटीदरम्यान ज्या विषयांवर चर्चा केली त्यासह विविध मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली. आम्ही तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रातील सहकार्याच्या प्रचंड क्षमतेबाबत चर्चा केली. या क्षेत्रात अमेरिकेसोबतची आपली भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.”
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2122651)
आगंतुक पटल : 65
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam