सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संस्कृती या विषयावरील 'संस्कृती का पांचवा अध्याय' या भाषणांच्या संकलनाचा 18 एप्रिल रोजी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र येथे प्रकाशन सोहळा

Posted On: 16 APR 2025 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 एप्रिल 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संस्कृतीवरील विचार आणि भाषणांचे संकलन, 'संस्कृती का पाचवा अध्याय', आता पुस्तकाच्या स्वरूपात वाचकांसाठी सादर केले जात आहे. या पुस्तकाचा औपचारिक प्रकाशन समारंभ शुक्रवार, 18 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5:00 वाजता नवी दिल्लीतील जनपथ येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र (आयजीएनसीए) येथील समवेत सभागृहात आयोजित केला जाणार आहे.

जुना आखाड्याचे प्रमुख आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांच्या हस्ते या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद राज्यसभेचे उपसभापती हरिवंश भूषवणार आहेत, तर आयजीएनसीएचे अध्यक्ष राम बहादूर राय हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

'संस्कृती का पाचवा अध्याय' म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी भारतीय संस्कृती, परंपरा, अध्यात्मिक मूल्य आणि सांस्कृतिक वारसा यासंदर्भात विविध प्रसंगी केलेल्या भाषणांचा संग्रह आहे. या पुस्तकाची प्रस्तावना राम बहादूर राय यांनी लिहिली आहे तर  डॉ. प्रभात ओझा यांनी  संकलन केले आहे. हे पुस्तक प्रभात प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.

 

* * *

S.Patil/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2122237)