माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज कॉस्प्ले चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील स्पर्धकांची नावे घोषित
कॉस्प्ले चॅम्पियनशिप मधून सृजनशीलता आणि फॅन्डोम संस्कृतीचा उत्सव साजरा होणार
प्रविष्टि तिथि:
16 APR 2025 4:06PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 16 एप्रिल 2025
वेव्हज (WAVES), वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट (डब्ल्यूएडब्ल्यूएस), अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदे अंतर्गत, गेल्या शनिवारी हैद्राबाद मधील माइंडस्पेस सोशल येथे पार पडलेल्या कॉस्प्ले चॅम्पियनशिप स्पर्धेच्या निमित्ताने सृजनशीलता आणि फॅन्डमचा जल्लोष पाहायला मिळाला. एमईएआय, इंडियन कॉमिक्स असोसिएशन आणि क्रिएटर्स स्ट्रीट यांनी, एपिको-कॉन च्या पाठबळाने आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय, टीव्हीएजीए आणि फॉरबिडन व्हर्स यांच्या सहयोगाने, आयोजित केलेला हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी ठरला, आणि कॉस्प्ले समुदाय आणि अॅनिमे फोरममध्ये आठवड्याच्या शेवटी तो ट्रेंडिंग विषय बनला.
आता, देशभरात व्यापक स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा, आणि हैदराबाद आणि मुंबईमधील बैठकींच्या मालिकेनंतर आयोजकांनी वेव्हज कॉस्प्ले चॅम्पियनशिपच्या अंतिम टप्प्यात स्थान मिळवणाऱ्या 29 सर्वात प्रतिभावान कॉसप्लेअर्सची यादी घोषित केली आहे. अंतिम फेरीतील हे स्पर्धक वेव्हज 2025 दरम्यान क्रिटोस्फियरमध्ये त्यांचे कौशल्य आणि सृजनशीलता प्रदर्शित करतील.
फॉरबिडन व्हर्सचे संस्थापक आणि कॉस्प्ले इव्हेंटचे आयोजक अजय कृष्णा यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या इतर स्पर्धांपेक्षा या चॅम्पियनशिपचे वेगळेपण म्हणजे, या स्वरूपाच्या इतर कार्यक्रमांमध्ये नियमितपणे चित्रित केल्या जाणाऱ्या इतर लोकप्रिय पात्रांपेक्षा, भारतीय पौराणिक कथा आणि पॉप संस्कृतीवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा खास डिझाइन करण्यात आली आहे.
वेव्हजमधील मुख्य चॅम्पियनशिप स्पर्धेपूर्वी 19 एप्रिल रोजी मुंबई वाइल्डकार्ड परिषद होणार आहे. या कार्यक्रमात वाइल्डकार्ड च्या निवडक स्पर्धकांचा अंतिम फेरीतील स्पर्धकांमध्ये समावेश केला जाईल, ज्यामुळे अनपेक्षित प्रतिभा पुढे येईल आणि स्पर्धा नवी उंची गाठेल. आश्चर्य, उत्कंठा आणि जागतिक दर्जाच्या कॉस्प्लेने भारावलेल्या चॅम्पियनशिपचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा!
अंतिम फेरीतील स्पर्धक:
1. कैझादशेषबरदारन – मुंबई
2. पुणे V – बंगळूरू
3. शेख समीर कलीम – लातूर
4. तेजल संजय मुळीक – मुंबई
5. अनुप भाटिया – पुणे
6. नवदीप सिंग पन्नू – मुंबई
7. आकाशी गौतम – लखनौ
8. आदित्य काळबेरे – पुणे
9. स्वराज काळबेरे – पुणे
10. श्रीहर्ष नरवडे – पुणे
11. विवेक दिलीप माने – पुणे
12. ईशा जोशी – मुंबई
13. केदार पंडित – मुंबई
14. अर्शीदेवरी – गुवाहाटी
15. मर्शी देवरी – गुवाहाटी
16. मो. पियाल शेख – मुंबई
17. प्रणय पानपाटील – मुंबई
18. गौरव विश्वकर्मा – पुणे
19. अखिल – हैदराबाद
20. स्तया – हैदराबाद
21. नुपूर मुंडा – हैदराबाद
22. नक्षत्र – हैदराबाद
23. रुचिरा कोरोलिन – हैदराबाद
24. सोनाली – हैदराबाद
25. नीरज कुमार – हैदराबाद
26. श्रावणी – हैदराबाद
27. अखिल सी.एच. – हैदराबाद
28. नयना साई श्री – हैदराबाद
29. लीलाधर – हैदराबाद
अंतिम फेरीतील स्पर्धकांची निवड त्यांची कारागिरी, अभिजातता, कामगिरी आणि पात्र अस्सल वठवण्यासाठीचे समर्पण या निकषांवर करण्यात आली.
वेव्हज (WAVES)
भारत सरकारद्वारे 1 ते 4 मे 2025 या कालावधीत मुंबईत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी मोलाचा टप्पा ठरणारी पहिली वेव्हज (WAVES), वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट (डब्ल्यूएडब्ल्यूएस), अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद आयोजित करण्यात आली आहे.
आपण उद्योग व्यावसायिक, गुंतवणूकदार निर्माते, अथवा इनोव्हेटर (नवोन्मेशी) असाल, ही परिषद एकमेकांशी जोडण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी, आणि नवोन्मेषासाठी आणि एम अँड ई परिप्रेक्ष्यात योगदान देण्यासाठी आगळे जागतिक व्यासपीठ मिळवून देईल.
वेव्हज, कंटेंट क्रिएशन (आशय निर्मिती), इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी (बौद्धिक संपदा) आणि टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनचे (तंत्रज्ञान नवोन्मेष) केंद्र म्हणून भारताचे स्थान उंचावून, भारताच्या सृजनशील प्रतिभेला बळ देईल. ब्रॉडकास्टिंग, प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन, रेडिओ, चित्रपट, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जनेरेटिव्ह एआय, ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर), व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर), आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (एक्सआर), हे उद्योग आणि क्षेत्र परिषदेच्या केंद्रस्थानी असतील.
काही प्रश्न आहेत का? येथे उत्तरे शोधा
ताज्या घोषणांसाठी पीआयबी टीम वेव्हजच्या संपर्कात रहा
चला, आमच्याबरोबर प्रवासाला! वेव्हसाठी लगेच नोंदणी करा
* * *
PIB Mumbai | S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
रिलीज़ आईडी:
2122103
| Visitor Counter:
42
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Khasi
,
English
,
Gujarati
,
Urdu
,
Nepali
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam