माहिती आणि प्रसारण मंत्रालय

वेव्हजच्या 'क्रिएट इन इंडिया' चॅलेंज अंतर्गत 'रेझोनेट: द ईडीएम चॅलेंज' साठी 10 सर्वोत्तम कलाकारांची घोषणा


निवडलेले दहा इलेक्ट्रॉनिक-नृत्य-संगीत प्रेमी वेव्हज समिटमध्ये थेट सादरीकरण करतील

Posted On: 12 APR 2025 4:07PM by PIB Mumbai


 

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (वेव्हज) 2025 च्या पार्श्वभूमीवर 'क्रिएट इन इंडिया' चॅलेंज अंतर्गत आयोजित 'रेझोनेट: द ईडीएम चॅलेंज' ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमुळे  इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (ईडीएम) मधील जागतिक प्रतिभेला एक मंचावर येण्याची संधी मिळाली आणि त्या अनुषंगाने संगीत निर्मिती आणि लाईव्ह परफॉर्मन्समध्ये नावीन्य, सर्जनशीलता आणि सहकार्य यांचे उत्तम सादरीकरण झाले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतीय संगीत उद्योगाच्या सहकार्याने आज 'रेझोनेट: द ईडीएम चॅलेंज' साठी निवडलेल्या 10 सर्वोत्तम  सहभागींची नावे जाहीर केली.

1 ते 4  मे 2025  दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्हजच्या जागतिक मंचावर होणाऱ्या ग्रँड फिनालेमध्ये थेट सादरीकरण करण्यासाठी, अत्यंत कठोर निवड प्रक्रियेनंतर आणि शेकडो प्रवेशिकांमधून  खालील दहा कलाकारांची निवड करण्यात आली आहे:

• श्रीकांत वेमुला, मुंबई, महाराष्ट्र

• मयंक हरीश विधानी, मुंबई, महाराष्ट्र

• क्षितिज नागेश खोडवे, पुणे, महाराष्ट्र

• आदित्य दिलबागी, मुंबई, महाराष्ट्र

• आदित्य उपाध्याय, कुमारिकाता, आसाम.

• देवांश रस्तोगी, नवी दिल्ली

• सुमित बिल्टू चक्रवर्ती, मुंबई, महाराष्ट्र

• मार्क रायन सायमलीह, मुंबई, महाराष्ट्र

• दिव्यजित रे, बोंगाईगाव, आसाम.

• नोबज्योती बोरुआ, मुंबई, महाराष्ट्र

हे 10 सर्वोत्तम कलाकार भारतातील इलेक्ट्रॉनिक संगीत समुदायाच्या एका उत्साही वर्गाचे  प्रतिनिधित्व करतात.  यांचे आवाज हळुवार आणि सुमधुर ते उच्च-ऊर्जेने युक्त नृत्य संगीतापर्यंत वैविध्याचे दर्शन घडविणारे आहेत. इलेक्ट्रॉनिक संगीत निर्मिती आणि डीजेईंगमधील भारतीय तसेच जागतिक स्तरावरील उदयोन्मुख प्रतिभेचा शोध घेणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे हे या आव्हानाचे उद्दिष्ट होते. या चॅलेंजच्या यशामुळे संगीत फ्यूजन, इलेक्ट्रॉनिक संगीत आणि डीजेईंग कलात्मकतेचे जागतिक केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत होणार आहे. हे निवड झालेले कलाकार आता त्यांच्या ग्रँड फिनाले परफॉर्मन्सची तयारी करणार आहेत, जिथे ते वेव्हजच्या जागतिक मंचावर त्यांची प्रतिभा सादर करतील.

प्राथमिक फेरीसाठी ज्युरी पॅनेल:

प्राथमिक फेरीचे परीक्षण भारतातील प्रमुख संगीत निर्मिती आणि डीजे प्रशिक्षण संस्था, लॉस्ट स्टोरीज अकादमी या ज्ञान-भागीदाराच्या संगीत व्यावसायिकांनी केले. परीक्षकांमध्ये अमेय जिचकार आणि अंशुमन प्रजापती यांचा समावेश होता. अमेय यांना रेकॉर्डिंग आणि मिक्सिंगचा दशकाहून अधिक अनुभव आहे आणि ते एक अनुभवी ऑडिओ इंजिनिअर आणि संगीत निर्माता आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये, जाहिरातींच्या जिंगल्समध्ये आणि प्रमुख ब्रँड मोहिमांमध्ये मोठ्या प्रमाणात काम केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय प्रकल्पांमध्ये वीरे दी वेडिंग, लैला मजनू, ऑक्टोबर आणि CRED, Flipkart आणि Upstox साठी केलेल्या व्यावसायिक कामाचा समावेश आहे. अंशुमन यांना  बीटबॉक्सिंगचा 10  वर्षांहून अधिक अनुभव आहे आणि गेल्या तीन वर्षांपासून ते संगीत निर्माता म्हणून काम करत आहे. अंशुमन लोफी आणि हिप-हॉप संगीतात विशेषज्ञ आहेत आणि त्यांच्या प्रायोगिक ध्वनी आणि स्वयंप्रेरित ए अँड आर साठी ओळखले जातात.

वेव्हज विषयी माहिती -

माध्यम आणि मनोरंजन (एम अँड ई ) क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरणारी,  पहिली  जागतिक दृकश्राव्य  आणि मनोरंजन शिखर परिषदेचे  (WAVES) भारत सरकारने 1 ते 4 मे 2025 दरम्यान  महाराष्‍ट्रातील मुंबई, येथे आयोजित केली आहे.

तुम्ही उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार, निर्माते किंवा नवोन्मेषक असलात तर, वेव्हज  - एक जागतिक व्यासपीठ म्हणून - जागतिक माध्यम आणि मनोरंजन  जगताशी जोडले जाण्यासाठी, सहयोग, नवोन्मेष तसेच  योगदान देण्यासाठी महत्वपूर्ण व्यासपीठ प्रदान करते.

आशय निर्मिती,बौद्धिक संपदा,तांत्रिक नवोन्मेश यासाठी महत्वाचे केंद्र म्हणून भारताचे स्थान उंचावत वेव्हज हा उपक्रम भारताची सर्जनशीलता वाढवेल. प्रसारण, मुद्रित माध्यमे, टेलिव्हिजन, रेडिओ, चित्रपट, अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता,  वर्धित वास्तव  (एआर), आभासी वास्तव (व्हीआर) आणि विस्तारित वास्तव (एक्सआर) यासारख्या उद्योग आणि क्षेत्रांवर वेव्हजमध्ये लक्ष केंद्रित केले जाईल.

याविषयी काही प्रश्न आहेत का? उत्तरे शोधण्‍यासाठी येथे क्लिक करा.

पी आय बी कडून टीम वेव्हज विषयी येणाऱ्या नवनवीन घोषणांबद्दल अपडेट राहा.

चला,आमच्याबरोबर या  ! वेव्हज साठी आत्ताच नोंदणी करा.

***

PIB Mumbai  | M.Pange/H.Kulkarni/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2121300) Visitor Counter : 44