माहिती आणि प्रसारण मंत्रालय

वेव्हज 2025 - क्रिएट इन इंडिया चॅलेंज मधील संगीत स्पर्धा संकल्पनेतील विजेत्यांची घोषणा 

Posted On: 11 APR 2025 6:34PM by PIB Mumbai

 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतीय संगीत उद्योगाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या 32 वेव्हज क्रिएट इन इंडिया चॅलेंज मालिकेचा एक भाग असलेल्या संगीत स्पर्धा संकल्पना या प्रकारातील विजेत्यांची आज घोषणा केली. मुंबईत 1 ते 4 मे 2025 या कालावधीत पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद, वेव्हज शिखर परिषद होणार आहे. 

 

भारताच्या वैविध्यपूर्ण संगीत प्रतिभेला केंद्रस्थानी ठेवून स्पर्धेची रचना करण्यात आली असून त्यासाठी देशभरातून शेकडो प्रवेशिका प्राप्त झाल्या. प्रतिष्ठित ज्युरींनी अतिशय कठोर मूल्यांकनानंतर अस्सलता, संगीताबद्दलची ओढ आणि वेव्हजच्या संकल्पनेशी सुसंगती या निकषांवर सहा विजेत्यांची निवड केली.

स्पर्धेतील ज्युरींमध्ये हिंदुस्तानी शास्त्रीय गायक आणि गुरु सोमेश कुमार माथूर, पार्श्वगायक आणि टॉलीवूड अभिनेता संदीप बक्चू , बॉलीवूडमधील संगीतकार आणि संगीत निर्माता गुलराज सिंग या भारतीय संगीत विश्वातील दिग्गज व्यक्ती होत्या.  

संगीत स्पर्धा संकल्पनेतील विजेते

 

पद

नाव

शहर

राज्य   

विजेता - 

कुणाल कुंडू आणि अल्लाप सरदार,

कोलकाता

पश्चिम बंगाल

प्रथम उपविजेता

विवेक दुबे

मुंबई

महाराष्ट्र

द्वितीय उपविजेता

भावगणेश थंबीरन

कोईम्बतूर

तामिळनाडू

तृतीय उपविजेता

जयनाथन आर

चेन्नई

तामिळनाडू

चतुर्थ उपविजेता

जयनाथन आर

(दुसऱ्या रचनेसाठी)

चेन्नई

तामिळनाडू

पाचवा  उपविजेता 

दीप राजेश डाबरे

पुणे

महाराष्ट्र

 

वेव्हज विषयी माहिती -

माध्यम आणि मनोरंजन (एम अँड ई ) क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरणारीपहिली  जागतिक दृकश्राव्य  आणि मनोरंजन शिखर परिषदेचे  (WAVES) भारत सरकारने 1 ते 4 मे 2025 दरम्यान  महाराष्‍ट्रातील मुंबई, येथे आयोजित केली आहे.

तुम्ही उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार, निर्माते किंवा नवोन्मेषक असलात तर, वेव्हज  - एक जागतिक व्यासपीठ म्हणून - जागतिक माध्यम आणि मनोरंजन  जगताशी जोडले जाण्यासाठी, सहयोग, नवोन्मेष तसेच  योगदान देण्यासाठी महत्वपूर्ण व्यासपीठ प्रदान करते.

आशय निर्मिती,बौद्धिक संपदा,तांत्रिक नवोन्मेश यासाठी महत्वाचे केंद्र म्हणून भारताचे स्थान उंचावत वेव्हज हा उपक्रम भारताची सर्जनशीलता वाढवेल. प्रसारण, मुद्रित माध्यमे, टेलिव्हिजन, रेडिओ, चित्रपट, अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्तावर्धित वास्तव  (एआर), आभासी वास्तव (व्हीआर) आणि विस्तारित वास्तव (एक्सआर) यासारख्या उद्योग आणि क्षेत्रांवर वेव्हजमध्ये लक्ष केंद्रित केले जाईल.

याविषयी काही प्रश्न आहेत का? उत्तरे शोधण्‍यासाठी येथे क्लिक करा.

पी आय बी कडून टीम वेव्हज विषयी येणाऱ्या नवनवीन घोषणांबद्दल अपडेट राहा.

चला,आमच्याबरोबर या  ! वेव्हज साठी आत्ताच नोंदणी करा.

***

PIB Mumbai  | N.Chitale/B.Sontakke/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2121089) Visitor Counter : 45