माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इनोव्हेट टू एज्युकेट उपक्रमातील अंतिम फेरीसाठी अव्वल दहा स्पर्धक: जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद अर्थात वेव्हज 2025 च्या पार्श्वभूमीवर हँडहेल्ड उपकरण डिझाइन चॅलेंजची घोषणा
Posted On:
09 APR 2025 9:44PM by PIB Mumbai
मुंबई, 9 एप्रिल 2025
द इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटी (IDGS) ने इनोव्हेट टू एज्युकेट उपक्रमातील हँडहेल्ड उपकरण डिझाइन चॅलेंज मधील अव्वल 10 स्पर्धकांची घोषणा केली आहे: आगामी जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद अर्थात वेव्हज 2025 चा भाग असलेल्या या स्पर्धेचे आयोजन द इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटी (IDGS) ने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने केले आहे. या माध्यमातून युवावर्गात तंत्रज्ञान, शिक्षण आणि गेमिंग यांची सांगड घालून नवकल्पना आणि हँडहेल्ड उपकरणांच्या डिझाईनच्या निर्मितीतून अध्ययनाच्या पद्धतीत क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा उद्देश आहे.
वेव्हज 2025 मधील क्रिएट इन इंडिया स्पर्धेचा एक प्रमुख उपक्रम म्हणून सुरू करण्यात आलेल्या इनोव्हेट टू एज्युकेट चॅलेंज मध्ये जगभरातील विद्यार्थी, डिझायनर्स, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञानप्रेमींना विविध वापरकर्ता गटांसाठी मनोरंजन आणि शिक्षणाची सांगड घालून भविष्यातील पोर्टेबल डिव्हाइसेसची रचना करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
उद्योगजगतातील अग्रणी, तंत्रज्ञ, शिक्षक आणि डिझायनर्स यांचा समावेश असलेल्या तज्ञ ज्युरी पॅनेलने कठोर मूल्यांकन केल्यानंतर 1856 नाविन्यपूर्ण कल्पनांच्या नोंदणीमधून अव्वल 10 अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. ज्युरी पॅनेलमध्ये एरुडिटिओचे सह-संस्थापक इंद्रजित घोष; ह्युऑनच्या इंडा आणि सार्कचे कंट्री मॅनेजर राजीव नागर आणि स्क्विड अकादमीचे सह-संस्थापक आणि उत्पादन प्रमुख जेफ्री क्रे यांचा समावेश आहे.
अंतिम दहा स्पर्धक
- कर्नाटक पर्व - कोड क्राफ्ट ज्युनियर (कर्नाटक)
- विद्यार्थी - मुलांसाठी स्मार्ट लर्निंग टॅब्लेट: एक परस्परसंवादी आणि अनुकूल शैक्षणिक मित्र (कर्नाटक आणि आंध्र प्रदेश)
- टेक टायटन्स- संवादात्मक लिखाण सहाय्यासह स्मार्ट हस्ताक्षर अध्ययन उपकरण(तमिळनाडू)
- प्रोटोमाइंड्स - एज्युस्पार्क (दिल्ली, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार)
- एपेक्स अचिव्हर्स - बोडमास क्वेस्ट: स्मार्ट शिक्षणासाठी गेमिफाइड मॅथ लर्निंग ( गेम्स च्या माध्यमातून गणिताचे अध्ययन ) (तामिळनाडू)
- विज्ञानकथा - मुलांसाठी परस्परसंवादी शैक्षणिक हाताने हाताळता येणाऱ्या उपकरणांची अत्यावश्यकता (इंडोनेशिया)
- V20 - VFit - खेळाद्वारे परस्परसंवादी शिक्षण (तामिळनाडू)
- वॉरियर्स - महाशास्त्र (देही)
- किड्डीमैत्री - एक हाताने हाताळता येणारा गणितीय गेमिंग कन्सोल (मुंबई, ओडिशा, कर्नाटक)
- ई-ग्रूट्स - मायक्रो कंट्रोलर मास्टरी किट (तामिळनाडू)
सर्जनशील आणि तांत्रिक प्रतिभेचा वापर करून भारत कशाप्रकारे गेमिफिकेशन आणि परस्परसंवादी सामग्रीच्या सामर्थ्याच्या सहाय्याने वास्तविक शैक्षणिक गरजा पूर्ण करणाऱ्या उपायांची उकल करु शकतो हे या चॅलेंजने दाखवून दिले आहे, असे इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटीचे अध्यक्ष राजन नवानी या स्पर्धेबद्दल बोलताना म्हणाले.
वेव्हज हँडहेल्ड व्हिडिओगेम डिझाइन चॅलेंज हे केवळ गेमिंगसाठी नव्हे तर भारताच्या हार्डवेअर परिसंस्थेत नावीन्यपूर्णतेच्या नवीन लाटेला चालना देण्याबद्दल आहे, असे इनोव्हेट टू एज्युकेट चॅलेंजचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नोडल अधिकारी आशुतोष मोहले यांनी सांगितले. "मायक्रोकंट्रोलर्सचा वापर करून तसेच ‘भारत सेमीकंडक्टर मोहिमे’शी सुसंगत पद्धतीने आम्ही तरुण मनांना सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाच्या क्षितिजावर स्वप्न पाहण्यास, डिझाइन करण्यास आणि उभारणी करण्यास प्रवृत्त करत आहोत," असे ते म्हणाले.
मुंबईतील वेव्हज 2025 दरम्यान एका विशेष कार्यक्रमात निवडण्यात आलेले हे अव्वल 10 संघ त्यांचे विचार सादर करतील. या आव्हानातील विजेत्यांना मंत्रालयाकडून ग्रँड फिनालेमध्ये सन्मानित केले जाईल.
इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटी विषयी
भारतात व्हिडिओ गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स, परस्परसंवादी मीडिया आणि डिजिटल मनोरंजनाचा प्रचार करणारी इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटी ही एक प्रमुख संस्था असून याद्वारे प्रतिभा विकास, नवोन्मेष आणि उद्योगजगताशी सहकार्याला प्रोत्साहन दिले जाते.
वेव्हज विषयी माहिती:
माध्यम आणि मनोरंजन (एम अँड ई ) क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरणारी, पहिली जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (WAVES) भारत सरकारने 1 ते 4 मे 2025 दरम्यान महाराष्ट्रातील मुंबई, येथे आयोजित केली आहे.
तुम्ही उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार, निर्माते किंवा नवोन्मेषक असलात तर, WAVES - एक जागतिक व्यासपीठ म्हणून - जागतिक माध्यम आणि मनोरंजन जगताशी जोडले जाण्यासाठी, सहयोग, नवोन्मेष तसेच योगदान देण्यासाठी महत्वपूर्ण व्यासपीठ प्रदान करते.
भारताला जागतिक सर्जनशीलता केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्याच्या दृष्टिकोनासह, वेव्हजचे उद्दिष्ट सर्जनशीलता, नवोन्मेष आणि जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करण्यासाठी नवीन मानके स्थापित करणे आहे. या शिखर परिषदेत भारताची सर्जनशील शक्ती वाढेल, आशय निर्मिती, बौद्धिक संपदा आणि तांत्रिक नवोन्मेषाचे केंद्र म्हणून त्याचे स्थान बळकट होईल. प्रसारण, मुद्रित माध्यमे, टेलिव्हिजन, रेडिओ, चित्रपट, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता, वर्धित वास्तव (एआर), आभासी वास्तव (व्हीआर) आणि विस्तारित वास्तव (एक्सआर) यासारख्या उद्योग आणि क्षेत्रांवर वेव्हजमध्ये लक्ष केंद्रित केले जाईल.
याविषयी काही प्रश्न आहेत का? उत्तरे शोधण्यासाठी येथे क्लिक करणे.
पी आय बी कडून टीम वेव्हज विषयी येणाऱ्या नवनवीन घोषणांबद्दल अपडेट राहा.
वेव्हज साठी आत्ताच नोंदणी करा.
* * *
PIB Mumbai | S.Patil/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2120625)
Visitor Counter : 27