पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत 9 एप्रिल रोजी नवकार महामंत्र दिवस कार्यक्रमात होणार सहभागी
पवित्र जैन मंत्रोच्चाराच्या माध्यमातून शांतता, आध्यात्मिक चेतना आणि सार्वत्रिक सौहार्दाला चालना देण्यासाठी एका जागतिक उपक्रमात 108 पेक्षा जास्त देशांचे लोक होणार सहभागी
प्रविष्टि तिथि:
07 APR 2025 8:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 एप्रिल 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 एप्रिल रोजी नवी दिल्लीत नवकार महामंत्र दिवस कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.
नवकार महामंत्र दिवस आध्यात्मिक सुसंवाद आणि नैतिक भान निर्माण करणाऱा संस्मरणीय उत्सव आहे. जैन धर्मातील सर्वात आदरणीय आणि सार्वत्रिक मंत्र असलेल्या नवकार महामंत्राच्या सामुदायिक पठणाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. अहिंसा, विनम्रता आणि आध्यात्मिक उत्थानाच्या सिद्धांतांवर आधारित या मंत्राच्या माध्यमातून प्रबुद्ध व्यक्तींच्या सद्गुणांविषयी आदरभावना व्यक्त केली जाते आणि आंतरिक परिवर्तनाची प्रेरणा मिळते. आत्म-शुद्धी, सहिष्णुता आणि सामूहिक कल्याण यांच्या मूल्यांवर चिंतन करण्याची प्रेरणा देणारा हा दिवस आहे. 108 पेक्षा जास्त देशांमधील लोक या शांतता आणि एकजुटीच्या जागतिक मंत्रोच्चारण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2119884)
आगंतुक पटल : 136
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam