अर्थ मंत्रालय
स्टँड-अप इंडियाची 9 वर्षे – आकांक्षांचे यशात रूपांतर
Posted On:
05 APR 2025 12:08PM by PIB Mumbai

5 एप्रिल 2016 रोजी सुरू झाल्यापासून, स्टँड-अप इंडिया योजना अनुसूचित जाती, जमाती आणि महिला उद्योजकांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने सुरू आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्यासाठी बँक कर्ज देऊन अडथळे दूर करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. गेल्या 9 वर्षांत, या योजनेने केवळ व्यवसायांना निधीच दिला नाही तर त्यांनी स्वप्नांना बळ दिले आहे, उपजीविका निर्माण केली आहे आणि संपूर्ण भारतात समावेशक विकासाला चालना दिली आहे.

स्टँड-अप इंडिया अंतर्गत उपलब्धी
स्टँड-अप इंडिया योजनेने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय वाढ दर्शविली आहे, 31 ऑक्टोबर 2018 रोजी मंजूर झालेल्या एकूण रकमेत 14,431.14 कोटी रुपयांवरून 17 मार्च 2025 पर्यंत वाढ होऊन ती प्रभावीपणे 61,020.41 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ही लक्षणीय वाढ देशभरातील उद्योजकांना सक्षम बनवण्यात या योजनेचा वाढता प्रभाव अधोरेखित करते.
या योजनेतून अनुसूचित जाती, जमाती समुदाय आणि महिला उद्योजकांसाठी (नोव्हेंबर 2018 ते नोव्हेंबर 2024 पर्यंत) लक्षणीय आर्थिक सक्षमीकरण दिसून आले:
अनुसूचित जाती खात्यांची संख्या 9,399 वरून 46,248 पर्यंत वाढली आणि कर्जाची रक्कम 1826.21 कोटी रुपयांवरून 9747.11कोटी रुपयांपर्यंत वाढली.
अनुसूचित जमातींच्या खात्यांची संख्या 2,841 वरून 15,228 झाली, मंजूर कर्जे 574.65 कोटी रुपयांवरून 3244.07 कोटी रुपयांवर पोहोचली.
महिला उद्योजकांच्या खात्यांची संख्या 55,644 वरून 1,90,844 झाली, मंजूर रक्कम 12,452.37 कोटी रुपयांवरून 43984.10 कोटी रुपयांवर पोहोचली.


निष्कर्ष
स्टँड-अप इंडिया योजना हा एक परिवर्तनकारी पुढाकार आहे. या अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती आणि महिला उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय कल्पना प्रत्यक्षात आणण्यास सक्षम बनवले जाते. कर्ज मंजुरी आणि वितरणात लक्षणीय यश मिळवून, ही योजना समावेशक वाढीला चालना देत आहे. ही योजना केवळ कर्जांबद्दल नाही; ती संधी निर्माण करण्याबद्दल, बदल घडवून आणण्याबद्दल आणि आकांक्षांना यशात रूपांतरित करण्याबद्दल आहे.
संदर्भ
PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
***
S.Pophale/H.Kulkarni/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2119252)
Visitor Counter : 14